मधुचंद्राच्या रात्रीच MBA पतीची पत्नीला अट; २ वर्षांत IAS झाली नाहीस तर... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, December 7, 2021

मधुचंद्राच्या रात्रीच MBA पतीची पत्नीला अट; २ वर्षांत IAS झाली नाहीस तर...

https://ift.tt/3IpDbA6
जमशेदपूर: झारखंडमध्ये एका विवाहितेने केलेली तक्रार सध्या चर्चेत आहे. तिने आपल्या घेतली आहे. त्याला कारणही तसेच गंभीर आहे. मंधुचंद्राच्या रात्री पतीने एक अजब मागणी पत्नीकडे केली आणि या मागणीमुळेच संसार सुरू होण्याआधीच पार विस्कटून गेला. आईवडिलांची इभ्रत आणि समाजाची भीती यामुळे पीडितेने याबाबत कुठे वाच्यता केली नाही. अन्याय सहन करत राहिली. पण, सहनशीलतेचा अंत झाला आणि आता तिने तडक पोलीस ठाणे गाठून आपली व्यथा मांडली. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पती आणि सासरच्या अन्य व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे व याप्रकरणी तपास सुरू आहे. ( ) वाचा: पूर्व जिल्ह्यातील पोटका भागातील ही घटना आहे. या विवाहितेच्या बाबतीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. १८ जून २०१८ रोजी याच्याशी पल्लवीचा सर्व रितीरिवाजांनुसार विधीवत विवाह झाला. पिता यांनी आपल्या लेकीची सासरी पाठवणी केली. मात्र, मधुचंद्राच्या रात्रीच पल्लवीकडे जयमाल्य याने अजब मागणी केली आणि त्यासोबत अटही घातली. दोन वर्षांच्या आत तू यूपीएससी परीक्षा पास हो आणि आयएएस अधिकारी बनवून दाखव तरच तुझ्यासोबत मी संसार थाटेन नाहीतर दोन वर्षांनी आपलं पती-पत्नी म्हणून नातं संपुष्टात येईल, असे जयमाल्य याने पल्लवीला सांगितले. सुरुवातीला पल्लवीने ही बाब गंभीरपणे घेतली नाही. सगळं काही सुरळीत होईल, असं तिला वाटलं. पण पतीने बोलणं टाकलं आणि सासरच्यांनीही तिला त्रास देण्यास सुरुवात केली. संसार वाचावा म्हणून ती हा त्रास सहन करत राहिली. मात्र तीन वर्षे झाली तरी त्रास थांबत नसल्याने व पतीचा हट्ट कायम असल्याने अखेर पल्लवीचा संयम सुटला आणि तिने पती व सासरच्या मंडळीविरोधात पोलिसांकडे तक्रार दिली. तिच्या घरचेही तिच्यासोबत उभे राहिले आहेत. न्यायासाठी पल्लवी सध्या पोलीस स्टेशन आणि न्यायालयाच्या चकरा मारत आहे. एमबीए पतीमुळे तिच्यावर ही वेळ आली आहे. वाचा: जयमाल्य मंडल हा एमबीए गोल्ड मेडलिस्ट आहे. सध्या सिटी युनियन बँकेत तो सहाय्यक शाखा व्यवस्थापक म्हणून सेवेत आहे. त्याचा हा प्रताप समोर आल्यानंतर पोलीसही चक्रावले आहेत. याप्रकरणी पोलीस सखोल तपास करत आहेत. एका उच्चशिक्षित व्यक्तीने पत्नीला अशाप्रकारची अट घातल्याने हे प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आहे. वाचा: