पाटणा: सरकार लवकरच राज्यात करणार आहे. याबाबत मुख्यमंत्री यांनीच माहिती दिली असून सर्वपक्षीय बैठकीत यावर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे नितीश यांनी सांगितले. जातनिहाय जनगणना व्हावी, अशी आमची भूमिका असून अशी जनगणना झाल्यास त्याचा राज्याच्या हितासाठी अधिक फायदा होईल, असा विश्वासही नितीशकुमार यांनी व्यक्त केला. ( ) वाचा: जातनिहाय जनगणनेचा मुद्दा सध्या बिहारमध्ये तापला आहे. याच मुद्द्यावर मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळाने पंतप्रधान यांची भेट घेतली होती व जातनिहाय जनगणनेसाठी आग्रह धरला होता. मात्र, देशपातळीवर अशी जातीच्या आधारावर जनगणना करता येणार नाही, असे नंतर केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतर नितीशकुमार सरकार राज्यस्तरावर अशी जनगणना करण्याचा निर्णय घेईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. सोमवारी नितीशकुमार यांनीच यावर सरकारची भूमिका स्पष्ट केली. वाचा: बिहारमध्ये जातनिहाय जनगणना करण्याची तयारी आम्ही सुरू केली आहे. याबाबत प्रथम आमचा सहयोगी पक्ष भाजपचं मत विचारात घेतलं जाणार आहे. उपमुख्यमंत्री पक्षातील प्रमुख नेत्यांशी बोलून त्यांचे मत कळवतील. त्यानंतर सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात येईल व सर्व पक्षांची मते विचारात घेऊन सर्वसहमतीनेच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे नितीशकुमार यांनी माध्यमांना सांगितले. जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय झाल्यानंतर लगेचच पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले. अशी जनगणना व्हायला हवी. ते राज्याच्या हिताचे आहे, ही आमची आधीपासूनच भूमिका राहिली आहे, असेही नितीश म्हणाले. वाचा: दरम्यान, बिहारमधील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे नेते यांनी सातत्याने जातनिहाय जनगणनेची मागणी लावून धरली आहे. ते पाहता सरकारही त्यासाठी राजी असल्याने आता यात अडसर येणार नाही असे दिसत आहे. केंद्रातील भाजप सरकार राष्ट्रीय स्तरावर अशा जनगणनेस राजी नसलं तरी राज्यात पक्षाकडून त्यास होकार दिला जाईल, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच बिहारमध्ये जातनिहाय जनगणना होणार हे जवळपास निश्चित झाले असून हा मुद्दा येत्या काळात देशात चर्चेत राहणार आहे. वाचा: