इम्रान यांची विकेट?; अग्निपरीक्षेआधीच मैदान सोडले, संसदेत नेमकं काय घडलं? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, April 10, 2022

इम्रान यांची विकेट?; अग्निपरीक्षेआधीच मैदान सोडले, संसदेत नेमकं काय घडलं?

https://ift.tt/ClJQe9A
इस्लामाबाद: पाकिस्तानात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तेच्या खेळात अखेर पंतप्रधान यांना मैदान सोडावे लागले आहे. संसदेत शनिवार दुपारपासून सुरू असलेला हायव्होल्टेज ड्रामा मध्यरात्रीनंतरही सुरू होता. ( ) वाचा : सभापती आणि उपसभापती यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला. त्यानंतर पॅनल ऑफ चेअरमन यांनी कार्यवाही पुढे नेली. त्याचवेळी आपला पराभव डोळ्यापुढे दिसत असल्याचे पाहून इम्रान खान यांच्या पक्षाच्या सर्व सदस्यांनी सभागृहातून पळ काढला. विशेष म्हणजे अविश्वास ठरावावरील मतदानासाठी घेण्यात आलेल्या या अधिवेशनापासून इम्रान खान दूरच राहिले. ते अखेरपर्यंत सभागृहात आले नाहीत. 'अखेरच्या चेंडूपर्यंत खेळणार' असे दावे करणाऱ्या इम्रान यांनी अग्निपरीक्षा न देताच पळ काढला. आता विरोधी पक्षनेते हे पाकिस्तानचे पुढचे पंतप्रधान असतील हे जवळपास निश्चित झाले आहे. वाचा : इम्रान खान यांची खुर्ची गेल्यानंतर ड्रामा तिथेच संपणार नसून नवे सरकार येत असताना इम्रान यांच्या अडचणीही वाढणार आहेत. त्याचे संकेत मिळू लागले आहेत. इम्रान यांना देश सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. पाकिस्तानातील देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळांवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचवेळी प्रमुख ठिकाणी बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. संसदेच्या बाहेर कैद्यांसाठीची व्हॅन तैनात ठेवली गेली आहे. इम्रान यांनी सरकारी निवासस्थान सोडल्याचेही वृत्त आहे. दरम्यान, इम्रान सरकारच्या शिफारशीवरून पाकिस्तानची संसद भंग करण्यात आली होती. मात्र, राष्ट्रपतींचा हा आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला व संसद पुनर्गठीत केली. त्याचवेळी विरोधी पक्षांनी आणलेल्या अविश्वास ठरावावर ९ एप्रिल रोजी मतदान घेण्याचे निर्देश कोर्टाने दिले होते. त्यानुसार शनिवारी संसदेचे कामकाज सुरू झाले होते. दिवसभर अनेकदा कामकाज तहकूब करावे लागले. वाचा :