CSK vs SRH : विजयाचे खाते कोण उघडणार? १९ वर्षाखालील स्टार खेळाडूला मिळणार संधी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, April 9, 2022

CSK vs SRH : विजयाचे खाते कोण उघडणार? १९ वर्षाखालील स्टार खेळाडूला मिळणार संधी

https://ift.tt/hLXBsO5
मुंबई: आयपीएल २०२२मध्ये आज (शनिवार) डबल हेडरचा दिवस आहे. पहिली लढत दुपारी आणि यांच्यात नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर दुपारी साडे तीन वाजता सुरू होईल. गतविजेते चेन्नई सुपर किंग्जने सुरुवातीच्या ३ लढती गमावल्या असून ते गुणतक्त्यात ते नवव्या स्थानावर आहेत. तर सनरायझर्स हैदराबादने देखील दोन लढती गमावल्या आहेत. या सामन्यात जो संघ विजय मिळवले तो आयपीएल २०२२ खाते उघडले. आयपीएलमध्ये चेन्नई आणि हैदराबाद यांच्यात आतापर्यंत १६ लढती झाल्या आहेत, त्यापैकी १२ वेळा चेन्नईने बाजी मारली आहे. हैदराबादने चेन्नईविरुद्ध १९२ सर्वाधिक तर १३४ सर्वात कमी धावसंख्या केली आहे. चेन्नईने २२३ ही सर्वाधिक तर १३४ सर्वात कमी धावसंख्या केली आहे. वाचा- आयपीएलच्या १५व्या हंगामात चेन्नईने दुसऱ्या सामन्यात २१० धावा केल्या होत्या. पण त्यांना या धावसंख्येचा बचाव करता आला नाही. तिसऱ्या लढतीत त्यांनी पंजाबच्या मजबूत फलंदाजीला १८० धावांवर रोखले, पण १८ षटकात चेन्नईचा १२६ धावांवर ऑलआउट झाला. चेन्नईचे फलंदाज आणि गोलंदाज त्यांची भूमिका योग्य पद्धतीने पार पाडताना दिसत नाहीत. मोईन अली, ड्वेन प्रिटोरियस, क्रिस जॉर्डन आणि ड्वेन ब्रावो यांना चांगली कामगिरी करता आली नाही. अन्य संघातील परदेशी खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. पण चेन्नई संघातील परदेशी खेळाडूंना तशी कामगिरी जमली नाही. वाचा- गोलंदाजीत ब्रावोच्या जागी आज श्रीलंकेचा फिरकीपटू महेशला संधी दिली जाऊ शकते. गेल्या सामन्यात ब्रावो शून्यावर बाद झाला होता. यामुळे संघाचे समन्वय बिघडत चालला आहे. पंजाबविरुद्ध त्याने ३ षटकात ३२ धावा दिल्या होत्या. या उटल महेशने ४८ टी-२० सामन्यात ६.०४च्या इकॉनमीने ५१ विकेट घेतल्या आहेत. तो पॉवर प्ले, मधळ्या आणि स्लॉग ओव्हरमध्ये उत्तम गोलंदाजी करू शकतो. हैदराबादच्या फलंदाजांविरुद्ध त्याचा वापर केला जाऊ शकतो. जलद गोलंदाजांमध्ये मुकेश चौधरी आणि तुषार देशपांडे यांना छाप पाडता आली नाही. त्यामुळे राज हंगरगेकर याला संधी दिली जाऊ शकते. वाचा- हैदराबाद संघाबाबत बोलायचे झाले तर पहिल्या दोन्ही सामन्यात त्यांनी फलंदाजी आणि गोलंदाजीत एकत्रपणे चांगली कामगिरी केली नाही. लखनौ संघाला फक्त १६९ धावांवर रोखण्याची कामगिरी त्यांनी केली होती. भुवनेश्वर कुमार, वॉशिंग्टन सुंदर आणि टी नटराजन यांनी दमदार गोलंदाजी केली. हैदराबाद संघात केन विलियमनस, निकोलस पुरन आणि एडेन मार्करम या ३ परदेशी फलंदाजांना स्थान दिले आहे. पण त्यांची कामगिरी अद्याप चांगली झालेली नाही. आजची लढत चुरशीची होणार यात कोणताही शंका नाही कारण दोन्ही संघ हंगामातील पहिल्या विजयासाठी धडपडत आहेत.