IPL 2022 : आतापर्यंत कोणालाच जमलं नाही ते गुजरातने करून दाखवलं, सामना संपल्यावर मिळाली गूड न्यूज - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, April 18, 2022

IPL 2022 : आतापर्यंत कोणालाच जमलं नाही ते गुजरातने करून दाखवलं, सामना संपल्यावर मिळाली गूड न्यूज

https://ift.tt/KMknGzY
मुंबई : रविवारी आयपीएलमध्ये झालेल्या दोन सामन्यांनंतर वेगळेच चित्र पाहायला मिळाले. रविवारच्या दुसऱ्या सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्सवर थरारक विजय साकारला. गुजरातने या सामन्यात जे करून दाखवलं ते अन्य कोणत्याही संघांना आतापर्यंत जमलेले नाही. त्याचबरोबर यावेळी दिग्गज संघांना धक्का दिला तो सनरायझर्स हैदराबादने. पाहा नेमकं घडलं तरी काय....गुजरातच्या संघाने यावेळी चेन्नईवर अखेरच्या षटकात एक चेंडू राखून विजय साकारला. या सामन्यापूर्वी गुजरातचा संघ हा गुणतालिकेत अव्वल स्थानावर होता. गुजरातने आतापर्यंत पाच सामने खेळले होते आणि पाच पैकी चार सामने त्यांनी जिंकले होते. आजच्या सहाव्या सामन्यात त्यांनी पाचव्या विजयाची नोंद केली. या पाच विजयासह गुजरातच्या संघाने १० गुणांची कमाई करत अव्वल स्थान कायम राखले आहे. आतापर्यंतच्या या आयपीएलमध्ये कोणत्याही संघाला १० गुणांची कमाई करता आली नाही. यावर्षीच्या आयपीएलमध्ये १० गुण पटकावणारा गुजरात हा पहिलाच संघ ठरला. त्याचबरोबर हैदराबादच्या संघानेही आजच्या विजयासह कमाल करून दाखवली आहे. या सामन्यापूर्वी हैदराबादचा संघ हा सहा गुणांसह सातव्या स्थानावर होता. पण आजच्या सामन्यात त्यांनी पंजाब किंग्सवर दमदार विजय साकारला. या विजयानंतर हैदराबादच्या संघाचे ८ गुण झाले आहेत. या ८ गुणांसह हैदराबादच्या संघाने सातवरून थेट चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. त्यामुळे हैदराबादच्या एका संघाने आजच्या विजयासह तीन संघांना धक्के दिले आहेत. हैदराबादच्या संघाला पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये पराबव पत्करावा लागला होता. त्यामुळे हैदराबादचा संघ हा गुणतालिकेत तळाला म्हणजेच १०व्या स्थानावर गेला होता. पण त्यानंतर हैदराबादच्या संघाने सलग चार सामने जिंकले आहेत आणि त्यांनी थेट चौथे स्थान गाठले आहे. त्यामुळे हैदराबादच्या संघाने जर अशीच सातत्यपूर्ण कामगिरी केली तर त्यांना आयपीएलच्या प्ले-ऑफमध्ये स्थान पटकावता येऊ शकते. त्यामुळे आता प्रत्येक संघांचे जवळपास आठ सामने बाकी आहेत. या आठ सामन्यांमध्ये आता कोणते संघ विजय मिळवतात, यावर आयपीएलच्या प्ले-ऑफचे गणित ठरणार आहे.