
वाशिम: वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपी नगरपालिकेचे दीपक इंगोले यांना लुचपत प्रतिबंधक विभागाकडून एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. (chief officer of washim nagarpalika has been arrested) तक्रारकर्त्याने त्यांच्या प्लॉटसमोरील अतिक्रमण काढण्यासाठी नगरपरिषदेकडे अर्ज केला होता. मात्र त्यावर कोणतीही कारवाई होत नव्हती. शेवटी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर एक लाख रुपयांच्या बदल्यात कारवाई करण्याचे ठरले. मात्र, तक्रादाराला ही रक्कम द्यायची नव्हती. त्यांनी वाशिमच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. अखेर सापळा रचून करण्यात आली आहे. क्लिक करा आणि वाचा- नागरिकांकडून अटकेचे स्वागत मंगरुळपीर नगरपालिकेत निवडून आलेले अध्यक्ष आणि सदस्यांची मुदत संपल्याने प्रशासक नेमण्यात आले होते. मात्र मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याची दबक्या आवाजात चर्चा होती. आज मुख्याधिकारी दीपक इंगोले यांना अटक केल्यानंतर नागरिकांनी नगरपालिकेसमोर फटाके फोडून कारवाईचे स्वागत केले आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-