हैदराबादच्या पराभवानंतरही कर्णधाराचे खडे बोल, म्हणाला'या तीन खेळाडूंना कोणीही विसरणार नाही' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, May 23, 2022

हैदराबादच्या पराभवानंतरही कर्णधाराचे खडे बोल, म्हणाला'या तीन खेळाडूंना कोणीही विसरणार नाही'

https://ift.tt/oHdx5gj
मुंबई : सनरायझर्स हैदराबादच्या संघाला अखेरच्या सामन्यात पंजाबकडून पाच विकेट्सने पराभव पत्करावा लागला. पण पराभवानंतरही हैदराबादचा हंगामी कर्णधार भुवनेश्वर कुमारने स्पष्टपणे काही गोष्ट सांगितल्या. या सामन्यात आम्हाला धावा फार कमी पडल्या आणि क्षेत्ररक्षणामुळे आम्ही हा सामना गमावला, असे भुवीने स्पष्ट सांगितले. पण त्याचबरोबर या हंगामात आम्ही प्ले ऑफमध्ये पोहोचू शकलो नसलो तरी आमच्या ंसघातील तीन खेळाडूंना कोणीही विसरू शकत नाही, असेही तो आवर्जुन यावेळी म्हणाला. भुवनेश्वर कुमारने कोणत्या तीन खेळाडूंची नावं घेतली, पाहा...हैदराबादच्या संघातून खेळत थेट भारतीय संघात स्थान मिळवणाऱ्या उमरान मलिकचे भुवीने यावेळी कौतुक केले. या आयपीएलमध्ये उमरानने भेदक मारा तर केलाच, पण आपल्या भन्नाट वेगाने त्याने फलंदाजांसह सर्वांनाच घायाळ करून टाकले. भुवीने उमराननंतर अभिषेक वर्माचे यावेळी नाव घेतले. हैदराबादच्या संघाला या युवा सलामीवीराने भन्नाट सुरुवात करून दिल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे या हंगामात हैदराबादच्या संघाला चांहली सुरुवात मिळू शकली. त्याचबरोबर ज्याच्यावर अन्याय झाल्याचे चाहतेही म्हणत आहे, अशा राहुल त्रिपाठीचे भुवीने यावेली नाव घेतले. भुवी म्हणाला की, " या हंगामात आम्ही प्ले ऑफमध्ये पोहोचू शकलो नाही. पण तरीही बऱ्यात सकारात्मक गोष्टी आम्हाला मिळाल्या आहेत. या हंगामात असे तीन खेळाडू आम्हाला मिळाले, ज्यांचा पुढच्या हंगामात नक्की चांगला फायदा संघाला होऊ शकतो. उमरान मलिक आणि अभिषक वर्मा यांनी तर दमदार कामगिरी केली आहे. पण यावेळी कोणीही राहुल त्रिपाठीला विसरूच शकत नाही." पंजाबने हैदराबादचा कसा केला पराभव, पाहा...पंजाबच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी स्विकारली आणि त्यांनी हैदराबादच्या फलंदाजीला चांगलेच वेसण घातले. त्यामुळे हैदराबादच्या संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही आणि त्यांनी पंजाबपुढे १५८ धावांचे आव्हान ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात चांगली झाली नसली तरी सलामीवीर शिखर धवनने एक बाजू लावून धरली आणि ३९ धावा केल्या. लायम लिव्हिंगस्टोनने २२ चेंडूंत दोन चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर नाबाद ४९ धावा फटकावल्या आणि संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.