छत्तीसगडच्या रायपूर विमानतळावर मोठी दुर्घटना, हेलिकॉप्टर क्रॅश, दोन पायलटचा मृत्यू - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, May 13, 2022

छत्तीसगडच्या रायपूर विमानतळावर मोठी दुर्घटना, हेलिकॉप्टर क्रॅश, दोन पायलटचा मृत्यू

https://ift.tt/Oao8CvT
: छत्तीसगडची राजधानी रायपूरमधील विमानतळावर हेलिकॉप्टरचं क्रॅश लँडिंग झाल्यानं कोसळल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामध्ये दोन पायलटचा मृत्यू झाला आहे. क्रॅश लँडिंग की आणखी कोणतं कारण या घटने मागं आहे हे स्पष्ट झालं नाही. हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यानंतर विमानतळावर खळबळ उडाली होती. हेलिकॉप्टर दुर्घटनेत एका पायलटचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या पायलटला रुग्णालयात नेताना त्याचा मृत्यू झाला. अपघातात राज्य सरकारच्या ताब्यातील हेलिकॉप्टर पूर्णपणे दुर्घटनाग्रस्त झालं आहे. ही दुर्घटना चाचणी घेत असताना घडली असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री यांनी ट्विट करुन रायपूर विमानतळावर घडल्याची दु:खद माहिती मिळाल्याचं म्हटलं आहे. आम्ही या दुर्घटनेत पायलट कॅप्टन पांडा आणि कॅप्टन श्रीवास्तव यांना गमावलं आहे, असं भूपेश बघेल म्हणाले. आम्ही यावेळी दोन्ही पायलटच्या कुटुंबीयांच्या दु: खात सहभागी आहोत, असं बघेल म्हणाले आहेत. हेलिकॉप्टर चाचणी करताना कोणत्या कारणानं क्रॅश लँडिंग झालं याची चौकशी करण्यात येईल, असं सांगण्यात आलं आहे. घटनास्थळी एक पथक पोहोचलं असून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. घटनास्थळावरील छायाचित्र मिळाली आहेत. हेलिकॉप्टरचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसत आहे. ही दुर्घटना मोठी असल्यानं एका पायलटचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या पायलटला रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला. हेलिकॉप्टर दुर्घटनेबद्दल मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पायलट ज्यावेळी सराव करत होते. हेलिकॉप्टर लँड करत असताना त्यामध्ये आग लागली आणि क्रॅश लँडिंग झाली. अद्याप राज्याच्या पोलिसांकडून यांसंदर्भातील अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. रायपूर मधील रामकृष्ण हॉस्पिटलनं दोन्ही पायलटचा मृत्यू झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. दरम्यान, भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बीपीन रावत यांचं हेलिकॉप्टर 8 डिसेंबर 2021 रोजी तामिळनाडूतील जंगलामध्ये क्रॅश झालं होतं. त्यामध्ये बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्यासह ११ जणांचा मृत्यू झाला होता.