
परभणी: अवैध वाळू उपशावर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करत सहाय्यक पोलीस अधीक्षकांच्या पथकाने अंदाजे ७ कोटी ५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर या प्रकरणी एकूण ४० आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस अधीक्षक जयंत नीना यांनी दिलेल्या माहितीवरून सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रनिक लोढा यांनी पथकासह कारवाई करून परभणीच्या पालम तालुक्यातील वझूर येथील गोदावरी नदी पात्रात सुरु असलेल्या अवैध वाळू उपशावर ही कारवाई केली. जिल्ह्यातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Police took action on illegal in ) परभणीचे पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी पालम तालुक्यातील राजुरी येथील वाळू घाटावरून मोठ्या प्रमाणात नियमाचे उल्लंघन करून बेसुमार वाळू उपसा केला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून त्यांनी गंगाखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक यांना कारवाई करण्यासंदर्भात सूचना दिल्या. त्यानुसार कारवाई केली असता वझूर येते २८ हायवा, ५ जेसीबी, १ बोटच्या सहाय्याने केला जात असल्याचे निदर्शनास आले. यावेळी त्या ठिकाणी आठ दुचाकी, १ चारचाकी असा एकूण जवळपास ७ कोटी ५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. दरम्यान उशिरापर्यंत वाझुर येथील वाळू घाटावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरूच होती. क्लिक करा आणि वाचा- ४० आरोपी घेतले ताब्यात वाझूर येथील वाळू घाटावर सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रनिक लोढा यांनी पथकासह ही कारवाई करून ४० आरोपींना ताब्यात घेतले आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून त्यांना ताब्यात घेतले जाणार असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या वाढणार असल्याचे चित्र आहे. क्लिक करा आणि वाचा- कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू वझुर येथील वाळू घाटावर सहाय्यक पोलीस अधीक्षक लोढा, गंगाखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील माने हे तळ ठोकून आहेत. बाळू घाटावर जप्त करण्यात आलेल्या मुद्देमाला वर कारवाई करण्याची प्रक्रिया अद्यापही सुरूच आहे रात्री उशिरा या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला जाण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून असल्याने या प्रकरणाची अधिक माहिती मिळू शकलेली नाही. क्लिक करा आणि वाचा-