राष्ट्रवादीने अनेक ठिकाणी आमच्या पाठीत खंजीर खुपसला, म्हणून...; नाना पटोलेंचा हल्लाबोल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, May 11, 2022

राष्ट्रवादीने अनेक ठिकाणी आमच्या पाठीत खंजीर खुपसला, म्हणून...; नाना पटोलेंचा हल्लाबोल

https://ift.tt/2GlhEnr
भंडारा: राज्यातील महाविकास आघाडीच्या प्रयोगाला बाजूला सारत भंडारा जिल्हा परिषदेवर (Congress) आणि भाजपने () हातमिळवणी करत काँग्रेसने परिषदेचे अध्यक्षपद, तर भाजपने उपाध्यक्षपद पदरात पाडून घेतले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (Nana Patole) यांनी याला जबाबदार राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अनेक ठिकाणी आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, म्हणूनच आम्हाला असा निर्णय घ्यावा लागला असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे. या निमित्ताने महाविकास आघाडीतील स्थानिक पातळीवरील खदखद बाहेर आल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. ( state president nana patole criticizes ) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षासोबत युती करून सत्ता स्थापन केलेली आहे. याबाबत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा देखील केलेली आहे. या चर्चेनंतर देखील स्थानिक पातळ्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपशीच युती केल्याचे दिसले आहे. गोंदिया जिल्हा परिषदेत देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपशीच युती केली, असे सांगत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. क्लिक करा आणि वाचा- भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काँग्रेसची साथ सोडत भाजपशी जवळीक केली. मात्र भंडारा जिल्ह्यात नाना पटोले यांनीही भाजपमधील एक गट फोडला. येथे भाजपचे चरण वाघमारे यांच्या गटाने काँग्रेस पक्षाला साथ दिली. या प्रयोगामुळे काँग्रेसकडे परिषदेचे अध्यक्षपद आले. तर चरण वाघमारे गटाला परिषदेचे उपाध्यक्षपद मिळाले आहे. माजी आमदार चरण वाघमारे यांनी काँग्रेसला साथ दिल्यामुळे भाजपने कारवाईचा बडगा उगारत त्यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे. क्लिक करा आणि वाचा- भंडारा जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल काँग्रेस- २१ सदस्य भाजप- १२ सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस- १३ सदस्य शिवसेना - १ सदस्य क्लिक करा आणि वाचा-