धक्कादायक! तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून केली आत्महत्या - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, May 17, 2022

धक्कादायक! तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून केली आत्महत्या

https://ift.tt/9MArGBv
जळगाव : जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील एका ३७ वर्षीय तरुण शेतकऱ्याने राहत्या घरात सोमवारी १६ मे सायंकाळी ५ वाजता गळफास घेवून केल्याची घटना उघडकीला आली आहे. प्रमोद भागवत पाटील (वय-३७, रा. तरडी ता. धुळे) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. (in a young farmer committed due to indebtedness) या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, प्रमोद भागवत पाटील हे आपल्या पत्नी व मुलासह आव्हाणे ता. जळगाव येथे वास्तव्याला होते. लहानपणीच आईवडीलांचे निधन झाल्याने ते आव्हाणे येथे मामाच्या गावाला रहायला आले होते. ते शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. अक्षयतृतीयेनिमित्त पत्नी आरती या मुलगा मनीषसोबत माहेरी गेल्या होत्या. त्यामुळे प्रमोद हा घरी एकटाच होता. क्लिक करा आणि वाचा- सोमवारी १६ मे रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास त्यांनी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. पाटील यांनी कर्जबाजारीपणातून आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. शेजारी राहणाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आल्याने घटना उघडकीला आली. पाटील यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. क्लिक करा आणि वाचा- याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल फेगडे हे करीत आहे. प्रमोद भागवत पाटील त्याच्या पश्चात त्यांची पत्नी आरती, मुलगा मनीष आणि मोठा भाऊ गजानन असा परिवार आहे. क्लिक करा आणि वाचा-