धक्कादायक! अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने केला खून - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, May 17, 2022

धक्कादायक! अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने केला खून

https://ift.tt/bMFw2lx
कोल्हापूर : येथील शाहूवाडी तालुक्यातील नांदगाव पैकी मांगूरवाडी येथे धक्कादायक घटना घडली आहे.अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याचे पाहून पती प्रकाश पांडुरंग कांबळे (वय ५२) याचा पत्नी वंदना प्रकाश कांबळे (वय ५०) हिने धारदार चाकूने वार करून व डोक्यात दगड घालून केला आहे. ही घटना रविवारी १५ मे रोजी रात्री घडली आहे. संशयित वंदना कांबळे हिने शाहूवाडी पोलिसांसमोर गुन्ह्यांची कबुली दिली आहे. तिच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी तिला अटक केली आहे. (in kolhapur wife murders her husband for obstructing an ) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहूवाडी तालुक्यातील लोळाणे येथील प्रकाश कांबळे आपल्या कुटुंबासह नंदगाव पैकी मांगुरवाडी येथे शेतात कामाला होता. प्रकाश कांबळे याला दारूचे व्यसन असून पत्नीच्या अनैतिक संबंधामुळं दोघांच्यात नेहमी वाद होत होता. क्लिक करा आणि वाचा- रविवार दि १५ मे रोजी मध्यरात्री याच कारणावरून पती-पत्नी मध्ये वाद झाला. प्रकाश पत्नी वंदना हिला शिवीगाळ करू लागला होता. दोघांचे कडाक्याचे भांडण सुरू असताना अचानक पत्नी वंदना हिने धारदार चाकूने प्रकाशच्या डोक्यात वार करून त्याच्या गुप्तांगांवर वार केले. मयत प्रकाश याचा प्राण जाईना म्हणून डोक्यात दगड घातला व दोरीने गळा आवळून खून केला. सोमवार दि १६ मे रोजी वंदना कांबळे हिने शाहूवाडी पोलिसात माझ्या पतीने आत्महत्या केल्याची फिर्याद दाखल केली. पोलिसांनी नांदगाव येथे जाऊन घटनेचा पंचनामा केला. तसेच मतदेह मलकापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला. क्लिक करा आणि वाचा- वैधकीय अधिकारी मयताचे शवविच्छेदन करीत असताना मयताच्या अंगावर व गुप्तागांवर चाकूचे वार दिसले. तसेच डोक्यातही गंभीर जखम झाली होती. वैधकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना घटनेची कल्पना देताच पोलिसांनी पत्नी वंदनाची चौकशी केली. त्यावेळी तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखविताच पत्नीने गुन्हयाची कबुली दिली. क्लिक करा आणि वाचा-