'मराठी पाट्या लावा, अन्यथा कारवाई करण्यात येईल', सुभाष देसाईंचा इशारा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, May 11, 2022

'मराठी पाट्या लावा, अन्यथा कारवाई करण्यात येईल', सुभाष देसाईंचा इशारा

https://ift.tt/NTw8c7J
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : राज्यातील दुकाने आणि आस्थापनांवर मराठी पाट्या लावण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार सर्व दुकानांना या महिनाभराच्या कालावधीत मराठी पाट्या लावाव्या लागतील, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मराठी भाषा मंत्री यांनी मंगळवारी दिला. 'दुकाने व आस्थापनांवरील पाट्या मराठीतच असाव्यात यासाठी विधिमंडळात कायदा केल्याने पळवाट बंद झाली आहे. मराठीत पाट्या लावण्याच्या नियमांची अंमलबजावणी महापालिका व नगरपालिकांवर सोपवण्यात आली आहे. मराठी पाट्या लावण्यासाठी दुकानदारांना वेळ देण्यात आला आहे', असे देसाई म्हणाले.