धक्कादायक! लग्नाच्या जेवणातून विषबाधा; १०० हून अधिक लोक रुग्णालयात दाखल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, May 16, 2022

धक्कादायक! लग्नाच्या जेवणातून विषबाधा; १०० हून अधिक लोक रुग्णालयात दाखल

https://ift.tt/0wtOVNd
परभणी: दर्गा रोड येथे लग्नाच्या जेवणातून १०० हून अधिक लोकांना विषबाधा () झाली असून सर्व बाधित लोकांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यात बाधित लोकांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे वृत्त समजताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (more than 100 people were admitted to hospital for poisoning after a ) या घटनेबाबत हाती आलेल्या वृत्तानुसार, परभणीतील दर्गा रोड परिसरात असलेल्या मेहबूब फंक्शन हॉल येथे एक विवाह समारंभ पार पडला. या सोहळ्यात जेवण झाल्यानंतर काही वेळाने सुमारे दीडशे लोकांना पोटदुखी, उलटी आणि मळमळ होणे असा त्रास जाणवू लागला. वेळीच सावधगिरी बाळगत या सर्वांना परभणीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांनी सांगितले. क्लिक करा आणि वाचा- परभणीतील दर्गा रोड परिसरात मेहबूब हॉलमध्ये पार पडलेल्या विवाह संमारंभातील वधूपक्ष हे परभणीचे तर, वरपक्ष हा जालना जिल्ह्यातील आहे. वधूचे वडील कलीम अन्सारी यांनी लग्नाचे निमंत्रण दिले होते. काल संध्याकाळी ५ वाजता हा पार पडला. तर दोन तासांनी म्हणजेच ७ वाजता जेवणावळ सुरू झाली. जेवण केल्यानंतर थोड्याच वेळात काहींना मळमळ होऊ लागली. तर काहींना चक्करही येऊ लागली. तर काहींना पोटदुखी आणि उलटीचा त्रास होऊ लागला. विवाह सोहळ्यात उपस्थित असलेल्या सुमारे १०० ते १५० जणांना हा त्रास जाणवू लागला. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-