'भाजपची सुपारी घ्यायची, हिंदुत्वाचे नाटक करायचे': राऊत यांचा राज ठाकरेंवर निशाणा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, May 11, 2022

'भाजपची सुपारी घ्यायची, हिंदुत्वाचे नाटक करायचे': राऊत यांचा राज ठाकरेंवर निशाणा

https://ift.tt/x4BnqWG
रत्नागिरी: शिवसेनेचे खासदार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांच्यावर त्यांच्या दौऱ्यावरून निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांनी व्यंगचित्र काढून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची टिंगल टवाळी केली होती. पण, आता राज ठाकरे यांनाच अयोध्येला जावे लागत आहे. हे राजकीय स्वार्थासाठी सुरु आहे, असे सांगतानाच राज यांना अयोध्येला जाण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. राज ठाकरे यांना रामलल्ला प्रसन्न होणार नाही, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे. (shiv sena mp criticizes mns chief ) खासदार राऊत हे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. भारतीय जनता पक्षाची सुपारी घ्यायची आणि हिंदुत्वाचे नाटक करायचे, हे ढोंगी हिंदुत्व ज्याने स्वीकारले आहे, त्या राज ठाकरे यांना अयोध्येत विरोध होणार हे सहाजिकच आहे, असेही विनायक राऊत राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडताना म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- राज ठाकरे यांना अयोध्येला जाण्याचा काहीही नैतिक अधिकार नाही. त्यांचे अयोध्येसाठी योगदान काय आहे?, असा सवाल उपस्थित करत केवळ रामाच्या नावावर ढोंगीपणा करून हिंदुत्ववाद्यांमध्ये फूट पाडून शिवसेनेला शह द्यायचा हा कपटी डाव टाकून राज ठाकरे अयोध्येला चालले आहेत. त्यामुळे रामलल्ला त्यांना कधीच प्रसन्न होणार नाही, अशी घणाघाती टीका राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर केली आहे. क्लिक करा आणि वाचा- राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधत असताना खासदार राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीकास्त्र सोडले आहे. महाविकास आघाडी आणि शिवसेना यांच्याशी लढण्यात देवेंद्र फडणवीस हे कमी पडले आणि म्हणून ते राज ठाकरे आणि नवनीत राणा यांचा वापर करत आहेत, अशी टीका विनायक राऊत यांनी फडणवीस यांच्यावर केली आहे. तसेच नवनीत राणा आणि राज ठाकरे यांचा बोलवता धनी भाजप आहेत अशी टीका खासदार राऊत यांनी केली आहे. क्लिक करा आणि वाचा-