नागपुरात न्यायाधीशांची पावणे तीन लाखांनी फसवणूक; मोबाइल केला हॅक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, May 19, 2022

नागपुरात न्यायाधीशांची पावणे तीन लाखांनी फसवणूक; मोबाइल केला हॅक

https://ift.tt/4XmHiha
: मोबाइल हॅक करून सायबर गुन्हेगाराने न्यायधीशांच्या बँक खात्यातून दोन लाख ७५ हजार ३९९ रुपयांची रक्कम अन्य खात्यात वळती केली. याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी सायबर गुन्हेगाराविरुद्ध फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. (in nagpur a ) क्लिक करा आणि वाचा- सोनाली कनकदंडे (वय ४२, रा.सिव्हिल लाइन्स) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. सोनाली कनकदंडे या न्यायाधीश आहेत. १४ मे रोजी त्यांना फास्ट टॅग रिचार्ज करायचे होते. त्यांनी गुगलवर फास्ट टॅगचे अ‍ॅप सर्च केले. त्यांनी मोबाइलमध्ये अ‍ॅप डाऊनलोड करीत फास्ट टॅग रिचार्ज केले. याच दरम्यान सायबर गुन्हेगाराने त्यांचा मोबाइल हॅक केला. त्यांच्या बँक खात्यातून दोन लाख ७५ हजार रुपये अन्य खात्यात वळते केले. याबाबत कळताच सोनाली कनकदंडे यांनी सीताबर्डी पोलिसांत तक्रार केली. क्लिक करा आणि वाचा- नागपुरातील सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करून सायबर गुन्हेगाराचा शोध सुरू केला आहे. क्लिक करा आणि वाचा-