सबसे बडा रुपय्या; दोन मुलांनी आपल्या बापालाच घातला गंडा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, June 1, 2022

सबसे बडा रुपय्या; दोन मुलांनी आपल्या बापालाच घातला गंडा

https://ift.tt/yo89NcP
सोलापूर : 'ना बाप बडा, ना भैय्या....सबसे बडा रुपय्या' असे म्हणतात ते कांही खोटे नाही. कारण मोहोळ तालुक्यातील गोटेवाडी या छोट्याशा गावांत दोन सख्या भावांनी मिळून आपल्याचं शेतकरी बापाला २ लाखांची टोपी घातलीय. त्यांनी बापाचे वापरुन हा हा प्रकार केला आहे. त्यामुळे संतप्त बापाने मोहोळ पोलिस ठाण्यात आपल्या दोन्ही मुलांच्या विरोधात रितसर गुन्हा दाखल केला आहे. (two children withdrew rs 2 lakh using their fathers in solapur) याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील जगन्नाथ भुजंगा कोकरे यांचे मोहोळ शहरातील भारतीय स्टेट बँकेमध्ये स्वतःचे खाते आहे. त्या खात्यात त्यांनी २ लाखापेक्षा जास्तीची रक्कम बचत म्हणून शिल्लक ठेवली होती. त्या खात्याला संलग्नित एटीएम कार्डही त्यांनी काढले होते मात्र त्याचा वापर केला नव्हता. असे असताना आज मंगळवारी दि. ३१ मेच्या सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ते मोहोळ येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत गेले व त्यांनी २ लाख रुपये काढण्यासाठी विड्रॉल भरला. मात्र त्यांच्या खात्यामध्ये केवळ ६४७ रुपये शिल्लक असल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. क्लिक करा आणि वाचा- त्यावर त्यांनी यासंदर्भात तात्काळ बँकेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारीच्या सुरांत चौकशी केली असता, त्यांच्या एटीएमच्या माध्यमातून २४ मे पासून वेगवेगळ्या ठिकाणाहून वेळोवेळी २ लाख रुपये काढून घेतल्याचे सांगितले. ही माहिती ऐकूण त्यांना धक्का बसला. क्लिक करा आणि वाचा- त्यानंतर अधिक चौकशी केल्यावर शेतकरी जगन्नाथ कोकरे यांच्या दोन्ही मुलांनी, सागर कोकरे आणि सचिन कोकरे यांनी संगनमत करून वडिलांना काहीच कल्पना न देता त्यांच्या परस्पर रक्कम काढल्याचे समोर आले आहे. स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता बापाच्या सेव्हिंग्ज खात्यांमधून एटीएम मधून चोरून घेतल्याचे उघड झाले. त्यामुळं संतप्त याप्रकरणी संतप्त जगन्नाथ कोकरे यांनी आपल्या सागर कोकरे आणि सचिन कोकरे या दोन्ही मुलांवर मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल शरद ढावरे करत आहेत. क्लिक करा आणि वाचा-