
: 'तू माझ्या मनात बसलीस, तू मला पहिल्याच दिवशी आवडली होतीस', असे म्हणत हात पकडत एका महिलेकडून एका कनिष्ठ लिपिकाने स्वीकारल्याचा संतापजनक प्रकार उस्मानाबादमध्ये घडला. हा धक्कादायक प्रकार उस्मानाबाद पोलीस अधिक्षक कार्यालयात घडला. या लिपिकाविरुद्ध आणि लाच स्वीकारल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई उस्मानाबाद लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे. (The clerk molested a female employee while accepting a ) एजाज अजीम शेख असे या लिपिकाचे नाव आहे.उस्मानाबाद पोलीस अधिक्षक कार्यालयातील २७ वर्षी महिला कर्मचारी यांनी बदलीसाठी अर्ज केला होता. कार्यालयातील कनिष्ठ लिपिक एजाज अजीम शेख याने वरिष्ठ लिपिक देसाई यांना सांगून बदली करून देण्यासाठी दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी काल केली होती. एजाज अजीम शेख आज त्यांच्याकडून १० हजार रुपयांची लाच पंचासमक्ष स्वीकारली आहे. क्लिक करा आणि वाचा- मात्र, ही एकीकडे ही लाच स्वीकारताना शेख याने महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केला. लाच घेतानाच तू माझ्या मनात बसलीस, तू मला पहिल्याच दिवशी आवडली होतीस, असे म्हणत शेखने महिला कर्मचाऱ्याचा हात धरून विनयभंग केला. या प्रकरणी शेख याला ताब्यात घेण्यात आले आहे. क्लिक करा आणि वाचा- उस्मानाबाद लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली. विभागाचे प्रमुख अशोक हुलगे यांनी ही कारवाई केली आहे. त्यांच्या पथकात शिधेश्र्वर तावसकर, विष्णु बेळे, विशाल डोके, अविनाश आचार्य यांचा समावेश होता. क्लिक करा आणि वाचा-