तेजस ठाकरेंची फ्रंट सीटवरुन लढ्याची करारी वज्रमुठ,आदित्य ठाकरेंचं शिवसैनिकांना आश्वासक अभिवादन - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, June 23, 2022

तेजस ठाकरेंची फ्रंट सीटवरुन लढ्याची करारी वज्रमुठ,आदित्य ठाकरेंचं शिवसैनिकांना आश्वासक अभिवादन

https://ift.tt/W7CusFT
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्ह करुन वर्षा निवासस्थान सोडणार असल्याचं म्हटलं होतं. उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह मध्ये सांगितल्याप्रमाणं वर्षा निवासस्थान सोडलं आहे. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान सोडलं आहे. या सगळ्या घडामोडींना कारणीभूत ठरलंय ते एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी केलेलं बंड होय. उद्धव ठाकरेंनी वर्षा निवासस्थान सोडताना त्यांना करोना संसर्ग झाल्यामुळं ते वेगळ्या कारमधून कार्यकर्त्यांच्या गर्दीतून बाहेर पडले. तर, दुसऱ्या गाडीतून तेजस ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे बाहेर पडल्या. मात्र, वर्षा निवासस्थानी शिवसैनिक मोठ्या प्रमाणात जमा झाले होते. तेजस ठाकरे यांच्या लढ्याची वज्रमुठ तेजस ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी शिवसैनिकांना अभिवादन केलं आणि ते त्यांच्या कारमधून मातोश्री निवासस्थानाकडे निघाले. तेजस ठाकरे यांनी यावेळी शिवसैनिकांना अभिवादन केलं. शिवसैनिकांना नमस्कार करत पुढील लढ्यासाठी तयार असल्याची वज्रमुठ तेजस ठाकरे यांनी दाखवली. मात्र, त्यांनी माध्यमांशी बोलण्यास त्यांनी नकार दिला. शिवसैनिकांची घोषणाबाजी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे वर्षा निवास्थानातून बाहेर पडले त्यावेळी शिवसैनिक भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. शिवसैनिकांनी देखील उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या.वर्षा निवासस्थान ते मातोश्री दरम्यानच्या मार्गावर शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. उद्धव ठाकरे रात्री साडे नऊच्या आसपास वर्षा बंगल्याच्या बाहेर पडले. त्यांच्या सन्मानासाठी बंगल्याबाहेर शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, दीपाली सय्यद यांच्यासह अनेक सेना पदाधिकारी होते. सगळ्यांनी आपल्या हातात असलेल्या फुलांचा वर्षाव मुख्यमंत्र्यांवर केला. शेकडो शिवसैनिकांनी गगनभेदी घोषणा दिल्या. उद्धव ठाकरे साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है... कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला..... अशा घोषणांनी वर्षा बंगल्याचा परिसर दुमदुमून गेला. शिवसैनिकांचं प्रेम पाहून उद्धव ठाकरेंना देखील गलबलून आलं. त्यांनी दोन्ही हात जोडून शिवसैनिकांचं अभिवादन स्वीकारलं. गर्दीतून वाट काढली अन् गाडीत बसून 'मातोश्री'च्या दिशेने निघून गेले.