'आमचा नेता पुन्हा विधानभवनात जाणार'; शेकडो खडसे समर्थक मुंबईकडे रवाना - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, June 19, 2022

'आमचा नेता पुन्हा विधानभवनात जाणार'; शेकडो खडसे समर्थक मुंबईकडे रवाना

https://ift.tt/B6xTJ7L
जळगाव : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते (Eknath Khadse) यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील खडसे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान सोमवारी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी खडसे यांच्या समर्थनार्थ शनिवारी रात्री जळगावातील शेकडो खडसे समर्थक मुंबईकडे रवाना झाले. एकनाथ खडसे यांचा विधान परिषदेत विजय होईल अशी आशा बाळगून खडसे समर्थक मुंबईकडे निघाले आहे. आमचा नेता पुन्हा विधानभवनात जाणार असल्याचा प्रचंड आनंद असल्याच्या भावना खडसे समर्थक कार्यकर्त्यांनी बोलून दाखविल्या आहेत. (Hundreds of supporters have left for Mumbai) आमचा नेता पुन्हा विधानभवनात जाणार आहे. विधानभवनात शेतकऱ्यांसह सर्व प्रश्नाला वाचा फोडणार आहे. त्यामुळे या नेत्याचा सच्चा कार्यकर्ता याचा मोठा आनंद आहे. त्यामुळे सर्व कामे सोडून या नेत्याच्या समर्थनार्थ मुंबईला जात असल्याचे भुसावळातील कार्यकर्ते नागो पाटील यांनी सांगितले. तसेच ज्या पध्दतीने आमदारकीची संधी दिली, तसेच मंत्रीपद देवूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी खडसे यांचा गौरव करावा अशीही भावनाही बोलून दाखविलीय. क्लिक करा आणि वाचा- विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी एकनाथ खडसे यांना विजयासाठी तीन ते चार मते मिळवावी लागणार आहेत. खडसे ही मते कोठून मिळवणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. खडसे यांच्या भाजपमधील निकटवर्तीय त्यांना मते देतील हा हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे. भाजप आमदार संजय सावकारे (Sanjay Savkare) हे एकनाथ खडसे यांना आपले मत देतील असे बोलले जात आहे. क्लिक करा आणि वाचा- याबाबत खुद्द सावकारे यांनी आपली भूमिका स्पष्टपणे व्यक्त केलेली आहे. याबाबत सावकारे यांना विचारले असता ते म्हणाले की, एकनाथ खडसे हे माझ्यासाठी आदर्श आहेत. मी आजही त्यांना मानतो. मात्र, मला पक्ष सांगेल त्यांलाच मी मतदान करणार आहे. क्लिक करा आणि वाचा- असे असले तरी, संजय सावकारे हे एकनाथ खडसे यांचे अत्यंत जवळचे समजले जातात. म्हणून ते नक्कीच खडसे यांना मत देतील असे बोलले जात आहे. सावकारे हे एकनाथ खडसे यांच्यामुळेच आमदार होऊ शकले असेही म्हटले जात असते.