
मुंबई : महेंद्रसिंग धोनी हा कर्णधार आणि खेळाडू म्हणून कसा होता, हे सर्वांनाच माहिती आहे. क्रिकेटमध्ये धोनीने बरेच नाव कमावले आहे. धोनीला या आयपीएलमध्ये पुन्हा एकदी कर्णधारपद भूषवण्याची संधी मिळाली. त्यानंतर आता धोनीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. कारण धोनीच्या घरी एक नवीन पाहुणी आली आहे. धोनीची पत्नी साक्षीने एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे आणि हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले आहे. धोनी जेव्हा क्रिकेट खेळत नसतो तेव्हा तो आपल्या फार्म हाऊसवर असतो. क्रिकेट खेळताना त्याला आपल्या कुटुंबियांना जास्त वेळ देता येत नाही. त्यामुळे तो क्रिकेट खेळत नसताना आपल्या कुटुंबियांना वेळ देणं पसंत करतो. धोनीला झिवा नावाची गोड मुलगीही आहे आणि तिचा शब्द तो खाली पडू देत नाही. धोनीची पत्नी साक्षी ही सोशल मीडियावर जास्त अॅक्टीव्ह असते. आपले आणि धोनीचे फोटो ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते. साक्षीने आता इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोसेट केला असून आपल्या घरी नवीन पाहुणी आल्याचे तिने सांगितले आहे. साक्षीचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. धोनी प्राण्यांची फार आवड आहे. धोनीच्या फार्म हाऊसवर श्वान, घोडे, ससे असल्याचे सर्वांनीच पाहिले आहे. आता या धोनीच्या घरी नवीन पाहुणी आली आहे, ही पाहुणी एक बकरी आहे. धोनीने खास गुजरातहून ही बकरी आणल्याचे समजते आहे. धोनीने वर्षभरापूर्वीच या बकऱ्या घेतल्या होत्या, पण त्या आपल्या फार्म हाऊसवर आणल्या नव्हत्या. पण आता धोनीने ही बकरी आपल्या फार्म हाऊसमध्ये आणल्याचे कळत आहे. त्यामुळे धोनीच्या फार्म हाऊसमध्ये आता यापुढे अजून कोणते प्राणी येणार आहेत, याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना नक्कीच असेल. धोनीच्या घरी जेव्हा नवीन पाहुणा येत असतो तेव्हा साक्षी त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. त्यामुळे आता यापुढे साक्षी यापुढे कोणता व्हिडिओ पोस्ट करते, याची चाहते वाट पाहत असतील.