महाराष्ट्रानंतर झारखंड राजस्थानचा नंबर, ममतांचंही सरकार पडणार, भाजपकडून पाडकामाचा प्लॅन जाहीर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, June 28, 2022

महाराष्ट्रानंतर झारखंड राजस्थानचा नंबर, ममतांचंही सरकार पडणार, भाजपकडून पाडकामाचा प्लॅन जाहीर

https://ift.tt/Dfy8FeG
कोलकाता : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्याचा प्रश्न आता सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे. एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदारांनी विधानसभा उपाध्यक्षांच्या विरोधात केलेल्या दाखल केलेल्या याचिकेवर पुढील सुनावणी ११ जुलै रोजी होणार आहे. सुप्रीम कोर्टातील प्रलंबित सुनावणीमुळं महाराष्ट्रातील सत्ताबदलाचा मुहूर्त लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झालीय. तर, दुसरीकडे महाराष्ट्रासारखं राज्य हाती येण्याची चिन्ह दिसू लागल्यानं भाजप नेत्यांचा उत्साह वाढलाय. महाराष्ट्रातील नेते सत्तांतरावर स्पष्टपणे बोलत नसले तरी पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी भाजपचा विरोधी सरकारं पाडण्याचा प्लान जारी केला आहे. सुवेंदू अधिकारी यांनी थेट राज्यांची यादी वाचून दाखवलीय. पहिला नंबर झारखंडचा महाराष्ट्रानंतर पुढील नंबर गैरभाजपशासीत राज्य म्हणजे झारखंडमधील हेमंत सोरेन यांचं सरकार, राजस्थानमधील अशोक गेहलोत यांचं सरकार पडेल, असं भाकीत केलं आहे. विशेष म्हणजे पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांचं देखील सरकार पडेल, असं सुवेंदू अधिकारी म्हणाले. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी सुवेंदू अधिकारी यांना प्रत्युत्तर दिलं आहे. सुवेंदू अधिकारी यांनी कूचबिहारमधील सभेला संबोधित करताना पहिल्यांदा महाराष्ट्रातील प्रश्न सोडवला जाईल. त्यानंतर झारखंड, राजस्थानचा नंबर असेल. हे सर्व झाल्यानंतर पश्चिम बंगालमधील सरकार पडेल, असं सुवेंदू अधिकारी म्हणाले. इतर भाजपशासीत राज्यांप्रमाण तृणमूल काँग्रेसला देखील सामोरं जावं लागेल, असं सुवेंदू अधिकारी म्हणाले. सुवेंदू अधिकारी यांना तृणमूल काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे नेते कुणाल घोष यांनी भाजपनं गेल्या वर्षीच्या पराभवातून धडा घेतलेला नाही, असं म्हटलं. भाजपनं गेल्यावर्षी झालेल्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत जोरदार प्रचार केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळ रिंगणात उतरलं होतं. मात्र, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालमधील विजयानंतर आणखी आक्रमक झाल्या आहेत. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांचा उमेदवार असावा, यासाठी ममता बॅनर्जींनी पुढाकार घेतलाय.