फक्त ८ महिन्यांमध्ये ६ कर्णधार बदलले, राहुल द्रविड नेमकं काय बोलले पाहा... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, June 20, 2022

फक्त ८ महिन्यांमध्ये ६ कर्णधार बदलले, राहुल द्रविड नेमकं काय बोलले पाहा...

https://ift.tt/dNKMshW
बंगळुरु : राहुल द्रविड भारताचे मुख्य प्रशिक्षक झाले तेव्हा आता भारतीय संघ स्थिरस्थावर होईल, असे बऱ्याच जणांना वाटले होते. पण गेल्या आठ महिन्यांमध्ये भारताने आता सहा कर्णधार पाहिल्याचे समोर आले आहे. या आठ महिन्यांमध्ये सहा कर्णधार झाल्यावर द्रविडही काहीसे निराश आहेत. पण या सहा कर्णधारांबद्दल द्रविड यांनी आपले मत व्यक्त केले आहे. आठ महिन्यांत का सहा कर्णधार झाले, पाहा द्रविड नेमकं काय बोलले...भारताने गेल्या आठ महिन्यांमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, रिषभ पंत आणि आता हार्दिक पंड्या असे सहा कर्णधार आपल्याला पाहायला मिळाले आहेत. याबद्दल द्रविड यांनी सांगितले की, " हे आव्हानात्मकही होते, आम्ही गेल्या आठ महिन्यांत सहा कर्णधारांना मैदानात उतरवले, जी खरोखर योजना नव्हती. पण हे आम्ही खेळत असलेल्या सामन्यांच्या संख्येमुळे आहे. करोनामुळे मला काही लोकांसोबत काम करायला मिळालं जे विलक्षण होतं. अनेक खेळाडूंना संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली, आम्हाला गटात आणखी नवीन कर्णधार तयार करण्याची संधी मिळाली. आम्ही सतत चांगली गोष्ट करण्याचा प्रयत्न करतो, आम्ही वेगवेगळ्या लोकांसोबत खूप प्रयत्न केले. गेल्या आठ महिन्यांतील दक्षिण आफ्रिका दौरा कसोटी क्रिकेटच्या दृष्टीने थोडा निराशाजनक ठरला आहे. पण बाकीच्या मालिकांमध्ये भारताने चांगली कामगिरी केली आहे. चांगल्या कामहिरीत सातत्य कसे राखता येईल, यावर आमचा भर असणार आहे." द्रविड यांनी यावेळी आयपीएलमुळे चांगले खेळाडू आणि गुणवत्ता समोर आल्याचे म्हटले आहे. द्रविड यांनी सांगितले की, " आयपीएलदरम्यान वेगवान गोलंदाजी प्रतिभा पाहणे आश्चर्यकारक होते, विशेषत: काही गोलंदाजांनी अतिशय वेगवान गोलंदाजी केली. नवीन गुणवत्ता आयपीएलमध्ये पाहायला मिळाली आणि या गोष्टीचा भारतीय संघालाही चांगला फायदा होऊ शकतो. आयपीएलमुळे भारतातील प्रतिभा पाहण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे आयपीएलचा भारतीय क्रिकेटला आतापर्यंत चांगला फायदा झाला आहे आणि यापुढेही होत राहील."