विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात, मोठा अनर्थ टळला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, June 29, 2022

विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात, मोठा अनर्थ टळला

https://ift.tt/Tnu6MXI
: लातूर शहरातील नांदगाव वेस जवळील सावली हाँस्पिटल जवळ आज विदयार्थी वाहतुक करणारी बस पल्टी झाली सुदैवाने यात जिवितहाणी झाली नाही बस मधील सर्व विदयार्थ्यां सुखरुप असल्यामुळे पालकांनी सुटकेचा श्वास सोडला. या बसच्या चालकाचा ताबा सुटल्याने ही बस उलटली असे सांगण्यात येत आहे. (A student bus has met with an accident in ) लातूर शहर हे राज्यात शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेले शहर आहे. लातूर येथील शाळेत प्रवेश मिळावा म्हणून पालक प्रयत्न करत असतात. येथील शाळेत ज्याचा प्रवेश झालाय त्या विदयार्थ्यांना येण्या-जाण्यासाठी बस उपलब्ध असतात. शहरातील बहुतांश शाळांनी बसची व्यवस्था केल्यामुळे शहरात शाळेच्या बस मोठ्या प्रमाणात आढळतात. क्लिक करा आणि वाचा- या बस विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित असाव्यात यासाठी कालच स्कूल बस सुरक्षा समितीची बैठक झाली होती. या बैठकीत या स्कूल बस चांगल्या स्थितीत असाव्यात, बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासह अनेक अटी घालण्यात आल्या आहेत. याची अंमलबजावणी तत्काळ केली असती तर कदाचित ही घटना टाळता येऊ शकली असती, अशी चर्चाही लातूरमध्ये चर्चा ऐकायला मिळत आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-