चार हजारांची लाच भोवली; सहाय्यक फौजदारासह पोलीस कर्मचाऱ्यास अटक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, June 29, 2022

चार हजारांची लाच भोवली; सहाय्यक फौजदारासह पोलीस कर्मचाऱ्यास अटक

https://ift.tt/EvfLm7D
: विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींविरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात मदत करण्यासाठी विवाहितेच्या वडिलांना ४ हजारांची मागणाऱ्या चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदारासह एका पोलीस कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी रात्री रंगेहाथ अटक केली आहे. सहाय्यक फौजदार अनिल रामचंद्र अहीरे (वय-५२, रा.वैष्णवी पार्क, चाळीसगांव) आणि पोलीस नाईक शैलेष आत्माराम पाटील, (वय-३८) असे अटकेतील पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. तक्रारदार हे ५५ वर्षीय असून त्यांच्या मुलीला विवाहानंतर सासरी त्रास होत होता. यामुळे तिने सासरच्या मंडळीच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल केला होता. या खटल्यात आम्ही मदत करून यासाठी तक्रारदार मुलीच्या वडिलांकडे सहायक फौजदार अनिल रामचंद्र अहिरे आणि पोलीस नाईक शैलेश आत्माराम पाटील यांनी पाच हजार रूपयांची लाच मागितली होती. क्लिक करा आणि वाचा- तडजोडीनंतर चार हजार रूपये देण्याचे ठरले. याबाबत तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार पडताळणी करुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने चाळीसगाव शहरातील एका सिग्नलजवळ चहाच्या टपरीवर अनिल अहिरे व शैलेश पाटील या दोघांना रंगेहाथ अटक केली. क्लिक करा आणि वाचा- पोलीस उपधीक्षक अधिकारी शशिकांत एस.पाटील, पोलीस निरिक्षक एन.एन.जाधव ,संजोग बच्छाव, एन.एन.जाधव, दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, अशोक अहीरे, सुनिल पाटील, रविंद्र घुगे, शैला धनगर, मनोज जोशी, जनार्धन चौधरी, सुनिल शिरसाठ, प्रविण पाटील, महेश सोमवंशी, नासिर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदिप पोळ यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. क्लिक करा आणि वाचा-