धक्कादायक! वडील फक्त ओरडले; १५ वर्षीय विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, June 30, 2022

धक्कादायक! वडील फक्त ओरडले; १५ वर्षीय विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल

https://ift.tt/Otdq4QG
रत्नागिरी : गुहागर तालुक्यात वेळणेश्वर भाटी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने शाळेत जाण्यावरुन वडील रागावले म्हणून टोकाचे पाऊल उचलत केली आहे. ही घटना मंगळवारी (ता. २८) रात्री घडली. पारस विकास पालशेतकर (व. १५) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. ओरडल्यानंतर रुसलेल्या पारसची समजूत काढण्यासाठी वडील गेले होते. त्यावेळी समोरचे दृश्य बघून त्यांना मोठा धक्का बसला. (The student committed suicide as the father shouted) पारस हा सह्याद्री शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल वेळणेश्र्वर मध्ये इयत्ता ९ वीत शिकत होता. त्याने माळ्यावरील खोलीत लोखंडी अँगलला नायलॉनची दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. वडिलांनी तात्काळ दोरीच्या विळख्यांमधून पारसला सोडवले. त्याला उपचाकरीता हेदवी प्राथमिक आरोग्य केंद्रात घेवून गेले. मात्र दुर्देवाने त्याची प्राण ज्योत मालावली होती. या सगळ्या प्रकाराने परिसरात हळळ व्यक्त होत आहे. गुहागर पोलीस ठाण्यात विकास भाग्या पालशेतकर (वय, ४८), रा. वेळणेश्वर भाटी यांनी या घटनेची माहिती दिली. त्यांचा मुलगा तो शाळेत जाण्यास तयार नव्हता. मी शाळेत जाणार नाही. मला शिकायचे नाही असे त्याचे म्हणणे होते. या मुद्द्यावर विकास पालशेतकर मंगळवारी (ता.२८) सायंकाळी पारसला रागावले. त्याचा राग येवून पारस घराच्या माळावरील एका खोलीत जावून बसला. रुसलेला पारस थोड्यावेळाने खाली येईल, असे समजून घराच्यांनी दुर्लक्ष केले. बराच वेळ झाला तरी पारस माळ्यावरुन खाली आला नाही, म्हणून समजूत काढून त्याला घरात बोलवण्यासाठी वडिल विकास गेले त्यावेळी हा धक्कादायक प्रकार समोर आला. क्लिक करा आणि वाचा- बुधवारी (ता. २९) हेदवी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर या मुलाचा मृतदेह पालकांच्या ताब्यात देण्यात आला. पोलीस निरीक्षक बी. के. जाधव यांनी सहकाऱ्यांसह हेदवी प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून पंचनामा आदी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. बुधवारी सकाळी शवविच्छेदन करुन पारसचा मृतदेह पालशेतकर कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला.अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची नोंद गुहागर पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली असून अधिक तपास गुहागर पोलीस करत आहेत. क्लिक करा आणि वाचा- दरम्यान, आशा स्वरूपाच्या धक्कादायक घटना अलीकडे अनेकदा घडताना दिसत आहेत या पार्श्वभूमीवर आम्ही मानसोपचारतज्ञ डॉ.अतुल ढगे यांच्याजवळ संपर्क साधला असता 'महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन' जवळ बोलतात याबाबत या घटनेची कारणे व त्याबाबत कोणती काळजी घेणे आवश्यक आहे याबाबत सांगितलेले मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत. क्लिक करा आणि वाचा -