म्हैसाळ हत्याकांड प्रकरणी मांत्रिकावर जादूटोणाविरोधी कायदा लावावा; डॉ. दाभोलकरांची मागणी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, June 30, 2022

म्हैसाळ हत्याकांड प्रकरणी मांत्रिकावर जादूटोणाविरोधी कायदा लावावा; डॉ. दाभोलकरांची मागणी

https://ift.tt/3P90Tjs
सांगली : ‘म्हैसाळहत्याकांड' प्रकरणी मांत्रिकावर लावावा, तसेच गुप्तधन, पैशांचा पाऊस यातून फसवणूक करणार्‍या मांत्रिकांच्या टोळ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्यकारी समितीचे सदस्य डॉ. हमीद दाभोलकर यांनी केली आहे. ते सांगलीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. () मिरज तालुक्यातल्या म्हैशाळ येथील वनमोरे हत्याकांड हा गुप्ताधनाच्या आमिषातून झाला असल्याचे उघडकीस आले आहे. एकाच कुटुंबातील ९ जणांच्या खुनाच्या या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सांगली पोलिसांनी दोघा मंत्रिकांना अटक केली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने म्हैसाळ याठिकाणी डॉ. हमीद दाभोलकर यांनी भेट दिली. तसेच याप्रकरणी सांगलीचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांची भेट देखील घेतली आहे. क्लिक करा आणि वाचा- यानंतर आयोजित पत्रकार बैठकीत बोलताना डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले, म्हैसाळ येथे एकाच कुटुंबातील नऊ जणांचा झालेला मृत्यू ही आत्महत्या नसून खून असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. गुप्तधन शोधण्याच्या प्रकरणात हे खून झाल्याचे प्राथमिक तपासात समजते. अघोरी अंधश्रद्धेच्या प्रकारातून ही घटना घडल्याचे पुढे येत असल्याने या प्रकरणातील अटक केलेल्या मांत्रिकांना जादूटोणाविरोधी कायदा लावावा, तसेच गुप्तधन, पैशांचा पाऊस अशी आमिषे दाखवून लुबाडणार्‍या जिल्ह्यातील मांत्रिकांच्या टोळ्यांचा पोलिसांनी शोध घेऊन, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी ‘महाराष्ट्र अंनिस’मार्फत राज्य कार्यकारी समिती सदस्य डॉ. हमीद दाभोलकर, राहुल थोरात आणि फारुख गवंडी यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केली आहे. क्लिक करा आणि वाचा- या बरोबरच म्हैसाळ भेटीदरम्यान संवाद साधताना गावातील काही लोकांकडून धक्कादायक माहिती समोर आली. ती म्हणजे गुप्तधन मिळवण्यासाठी ५ कोटींचे कर्ज वनमोरे बंधूंनी घेतले होते. त्यांना गुप्तधनानंतर ३०० कोटी मिळणार होते, ज्यातून ते गावात पाच कारखाने सुरू करणार होते. तसेच गावात आणखी काही कुटुंबे गुप्तधनाच्या विळख्यात असल्याचे समोर आल्याचेही डॉ. हमीद दाभोलकर यांनी सांगितले. क्लिक करा आणि वाचा-