बॉलिंगपूर्वी करतो झिंगाट डान्स, क्रिकेट विश्वातील व्हायरल व्हिडिओ पाहाल तर पोट धरून हसाल... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, June 22, 2022

बॉलिंगपूर्वी करतो झिंगाट डान्स, क्रिकेट विश्वातील व्हायरल व्हिडिओ पाहाल तर पोट धरून हसाल...

https://ift.tt/o8LtyJT
मुंबई : क्रिकेट विश्वात आतापर्यंत तुम्ही बरेच गोलंदाज पाहिले असतील. गोलंदाजांच्या विविध शौलीही तुम्ही पाहिल्या असतील. पण गोलंदाजीपूर्वी एखाद्या गोलंदाजाने झिंगाट डान्स केला आहे, असं मात्र तुम्ही पाहिलं नसेल. पण अशी एक गोष्ट क्रिकेटच्या मैदानात घडली आहे. या खास गोलंदाजीचा व्हिडिओ क्रिकेट विश्वात चांगलाच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. नेमकं घडलं तरी काय, जाणून घ्या... अनेक वेळा क्रिकेटच्या मैदानावर खेळाडू त्यांच्या गोलंदाजी शैलीपेक्षा काही तरी वेगळचं करताना दिसतात. अनेक दिग्गज गोलंदाजांच्या शैलीही कॉपी केल्या जातात. काही क्रिकेटप्रेमी त्यांच्या आवडत्या गोलंदाजाच्या शैलीची कॉपी करणारे व्हिडिओ पोस्ट करतात आणि ते व्हायरल देखील होतात, अशीच एक विचित्र गोलंदाजीची शैली ती आहे इंग्लंड क्रिकेट फॅन जॉर्ज मॅकमेनेमीची. जॉर्ज स्वत:ला जगातील सर्वात वाईट क्रिकेटर म्हणून संबोधतो, पण त्याची गोलंदाजी खूपच विचित्र आहे. कारण चेंडू टाकण्यापूर्वी तो मैदानात भन्नाट डान्स करत असल्याचे पाहायला मिळते. जॉर्ज मॅकमेनेमी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि त्याच्या गोलंदाजीशी संबंधित व्हिडिओ देखील पोस्ट करतो. त्याने मंगळवारी एका सामन्यातील त्याच्या गोलंदाजीचा व्हिडिओ पोस्ट केला, जो आतापर्यंत जवळपास ३ लाख वेळा पाहिला गेला आहे. तो बॉल टाकण्याआधी डान्स करतो आणि बॉल त्याच्या हातात बऱ्याच वेळापर्यंत ठेवतो, मग हात फिरवीन तो चेंडू फलंदाजाच्या दिशेने टाकतो. फलंदाजालाही समजत नाही आणि चेंडू थेट त्याच्याकडे जाऊन पडतो. या वेळी काही वेळा फायदा होतो. जॉर्जची आई ट्रेसी यांचे २०१७ साली निधन झाले,तेव्हा तो ग्रॅज्युएशन सुरू करणार होता. मात्र, यानंतर त्याला अनेक मानसिक समस्यांना सामोरे जावे लागले आणि त्याला काही समस्या येऊ लागल्या. त्यानंतर त्याने क्रिकेटला सुरुवात केली. त्यानंतर त्याने २०१७-१८ साली झालेल्या अॅशेस मालिकेचे सामने पाहिले आणि त्यानंतर तो या खेळाच्या इतका प्रेमात पडला की त्याचे आयुष्यच बदलून गेले.