
जळगाव : विधानपरिषद निवडणुकीत () राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते () यांचा विजय झाला आहे. या विजयाचा खडसेंचा तालुका व गाव असलेल्या मुक्ताईनगर शहरात कार्यकर्त्यांतर्फे जोरदार जल्लोष करण्यात आला. याच दरम्यान काही कार्यकर्त्यांनी मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार व एकनाथ खडसे यांचे कट्टर राजकीय विरोधक (MLA ) यांच्या घरासमोर फटाके फोडल्याने दोन्हीकडील कार्यकर्ते आमनेसामने आल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. (tensions erupted when firecrackers of khadses victory exploded in front of chandrakant patils house) विधानपरिषद निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असताना मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार एकनाथ खडसे यांचा विजय घोषित होण्यापूर्वीच कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष सुरू केला. एकनाथ खडसे त्यांच्या विजयानंतर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली. तर, दुसरीकडे शिवसेनेचेही (Shiv Sena) उमेदवार विजयी झाल्याने आमदार चंद्रकात पाटील यांचे कार्यकर्ते फटाके फोडून जल्लोष साजरा करत होते. क्लिक करा आणि वाचा- आमदार चंद्रकांत पाटील व एकनाथ खडसे यांचे कार्यकर्ते आमने-सामने यादरम्यान, काही कार्यकर्त्यांनी मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार व एकनाथ खडसे यांचे कट्टर राजकीय विरोधक चंद्रकांत पाटील यांच्या घरासमोर फटाके फोडल्याने आमदार चंद्रकांत पाटील व एकनाथ खडसे यांचे कार्यकर्ते आमने-सामने आले. यामुळे मुक्ताईनगरमध्ये तणावाचे वातावरण तयार झाले होते. परिस्थितीचे गांभिर्य ओळखून पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. क्लिक करा आणि वाचा- दरम्यान, सद्यस्थितीत मुक्ताईनगर शहरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांच्या वतीने मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनीही शांततेचे आवाहन केले असून शांतता भंग करणाऱ्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. क्लिक करा आणि वाचा-