पुणे: गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्यावतीने (म्हाडा) पुणे विभागातील नागरिकांसाठी चार हजार ७४४ घरांची ऑनलाइन पद्धतीने सोडत लवकरच जाहीर होणार आहे. येत्या काही दिवसांत या बाबतची जाहिरात प्रसिद्ध होणार असून त्यानंतर इच्छुकांना अर्ज भरता येणार आहे. पुण्यासह पिंपरी चिंचवड, ताथवडे, कोल्हापूर, सोलापूर भागातील घरांचा सोडतीमध्ये समावेश आहे.म्हाडाच्या पुणे विभागाचे मुख्य अधिकारी नितीन माने - पाटील यांनी माहिती दिली. ‘गेल्या काही वर्षातील पुणे विभागाच्या म्हाडाची ही दहावी सोडत ठरली आहे. गेल्या दोन वर्षात म्हाडाने काढलेली ही चौथी तर या वर्षातील ही घरांची पहिली सोडत आहे. पुणे विभागातील पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर या ठिकाणच्या चार हजार ७४४ एवढ्या घरांची ऑनलाइन पद्धतीने सोडत लवकरच काढण्यात येणार आहे. जाहिरात प्रसिद्ध करून त्यानंतर इच्छुकांना घरांसाठी अर्ज भरता येणार आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर एक महिन्याच्या मुदतीत अर्ज भरता येईल,’ अशी माहिती म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने पाटील यांनी दिली. मुंबईत म्हाडा दिवाळीमध्ये ३ हजार घरांची सोडत काढणार राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पहाडी गोरेगाव,मुंबई येथील म्हाडा प्रकल्पाला भेट देऊन प्रगतीपथावर असलेल्या कामाची पाहणी केली. लवकरच हे काम पूर्ण होऊन या सदनिका नागरिकांना वाटपासाठी खुल्या होतील, असं ते म्हणाले. यावेळी म्हाडाचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. दिवाळीत ३००० घरांची सोडत निघेल, अशी माहिती त्यांनी दिली. अंबरनाथमध्ये म्हाडा २०० एकरावर टाऊनशिप उभारणार अंबरनाथ शहरात म्हाडाकडून राज्यातली सर्वात मोठी टाऊनशिप उभारण्यात येणार आहे. यासाठी चिखलोली धरणाला लागून असलेल्या २०० एकर जागेचा आज म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडून सर्व्हे करण्यात आला. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. मुंबई उपनगर परिसराची लोकसंख्या सध्या झपाट्यानं वाढत चालली आहे. मात्र, लोकसंख्येचावाढता भर मुंबईला पेलवणारा नाही. त्यात सध्या डोंबिवलीच्या पुढे, म्हणजे फक्त अंबरनाथ आणि बदलापूरमध्येच मोकळ्या जागा शिल्लक आहेत. त्यामुळे या परिसरात म्हाडाकडून मेगा टाऊनशिप उभारण्यात येणार असल्याचं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.