यूक्रेनला नाटो ऐवजी युरोपियन युनियनचं सदस्यत्व मिळणार, रशिया भडकण्याची शक्यता - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, June 18, 2022

यूक्रेनला नाटो ऐवजी युरोपियन युनियनचं सदस्यत्व मिळणार, रशिया भडकण्याची शक्यता

https://ift.tt/vAPu16U
ब्रुसेल्स : रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्धाचा आज ११३ वा दिवस आहे. रशियानं यूक्रेनच्या नाटोतील सहभागाच्या मुद्यावरुन लष्करी आक्रमणाला सुरुवात केली होती. यूरोपियन कमिशननं यूक्रेनला मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. यूक्रेना युरोपियन युनियनचा सदस्य म्हणून दर्जा देण्यात यावा अशी शिफारस करण्यात आली आहे. आता पुढील आठवड्यात ब्रुसेल्स इथं होणाऱ्या एका परिषदेत २७ देशांचे प्रतिनिधी यूक्रेनच्या सदस्यत्वावर चर्चा करतील. युरोपियन युनियनच्या सर्व देशांनी सहमती दर्शवल्यास यूक्रेनचा मार्ग सुकर होईल. यूक्रेन गेल्या अनेक वर्षांपासून युरोपियन युनियनमध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्न करत आहे. शिफारस झाली पण मार्ग खडतर यूरोपियन कमिशननं यूक्रेनला युरोपियन युनियनचं सदस्यत्व द्यावं म्हणून शिफारस केली आहे. आता २७ देशांच्या संयुक्त बैठकीत या शिफारशीवर सहमती होणं आवश्यक आहे. यूक्रेनला युरोपियन युनियनचं सदस्यत्व देण्यापूर्वी व्यापक चर्चा होण्याची शक्यता आहे. जर, २७ देशांनी सहमती दर्शवली तरच यूक्रेन युरोपियन युनियनचा भाग बनेल. एखाद्या देशानं काही आक्षेप नोंदवल्यास यूक्रेनला त्यावर स्पष्टीकरण द्यावं लागेल. गेल्या आठवड्यात यूक्रेनच्या दौऱ्यावर आलेल्या यूरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी यासंदर्भात महत्त्वाचं वक्तव्य केलं होतं. यूक्रेनला प्रशासकीय सुधारणा आणि इतर ठिकाणी प्रगतीशिवाय अजून बऱ्याच गोष्टी करण्याची गरज असल्याचं त्या म्हणाल्या होत्या. यूक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी देखील त्यांनी चर्चा केली होती. यूक्रेननं देशाची कायदा आणि सुव्यवस्था सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असं उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी म्हटलं आहे. यूक्रेनला भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी सुधारणांची गरज असल्याचं त्या म्हणाल्या होत्या. रशिया आक्रमक होणार यूक्रेनच्या नाटो आणि युरोपियन युनियनमध्ये सहभागी होण्याच्या हालचालींमुळं रशिया भडकला होताय रशियानं यूक्रेनवर हल्ला करण्याच प्रमुख कारण हे नाटोमधील सहभाग आहे. त्यामुळं यूक्रेन जर युरोपियन युनियनमध्ये सहभागी झाल्यास रशियाचा मोठा पराभव मानला जाऊ शकतो. त्यामुळं रशियाकडून यूक्रेनवर मोठ्या प्रमाणात हल्ले केले जाऊ शकतात.