म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई कामगार नगर येथे राहणाऱ्या एका सेवानिवृत्त सहायक आयुक्तांच्या घरातून , पाच जिवंत काडतुसे आणि ८ लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. रिव्हॉल्वर आणि जिवंत काडतुसे चोरीला गेल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Retired policeman's ) कुर्ला पूर्व कामगार नगर येथील बंगला क्रमांक २० या ठिकाणी दिगंबर काळे (६६) हे सेवानिवृत्त सहायक आयुक्त कुटुंबासह वास्तव्यास आहेत. काळे हे २३ एप्रिल रोजी कुटुंबासह गावी गेले होते, मंगळवारी ते गावाहून परत आले असता त्यांच्या बंगल्याच्या स्वयंपाक घराच्या ग्रील तुटलेली दिसली. त्यांनी घरात जावून पाहिले असता रोख ४० हजार रूपये, सोन्याचे चांदीचे दागिने आणि त्यांची परवाना असलेली ३२ बोअर ची रिव्हॉल्वर व ५ जिवंत काडतुसे चोरीला गेल्याचे दिसून आले. क्लिक करा आणि वाचा- काळे यांनी याबाबत नेहरूनगर पोलिस ठाण्यात तक्रार केली. नेहरूनगर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करून पोलिसांची तीन पथके या चोराच्या शोधासाठी तयार करण्यात आली आहेत. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-