ठाकरेंकडून शिंदेंची हकालपट्टी, साहेब महाराष्ट्राचे नेते झाले, केसरकरांची पहिली प्रतिक्रिया - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, July 2, 2022

ठाकरेंकडून शिंदेंची हकालपट्टी, साहेब महाराष्ट्राचे नेते झाले, केसरकरांची पहिली प्रतिक्रिया

https://ift.tt/GwNuzFD
मुंबई : पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाविरोधात बंड करून भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदेंविरोधात मोठी कारवाई केली आहे. यांची पक्षनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. सेनेच्या ३८ आमदारांसह एकनाथ शिंदे यांनी बंड करत भाजपसोबत सरकार स्थापन केलं. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिंदे यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे. उद्धव ठाकरेंच्या कारवाईवर एकनाथ शिंदे गटाकडून प्रवक्ते दीपक केसरकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही कितीही डाव खेळले तरी आम्ही दबावाला बळी पडणार नाही, असं केसरकर म्हणाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतात ते राज्याचे सर्वोच्च सभागृह विधिमंडळ पक्षाचे नेते बनतात.विधिमंडळ पक्षाचे नेते असलेल्या व्यक्तीचं खालचं पद काढून घेतल्यानंतर वाईट का वाटावं, असं दीपक केसरकर म्हणाले. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नेते झाले आहेत. तुम्ही कितीही डाव खेळलात तरी आम्ही दबावाला बळी पडणार नाही, असं दीपक केसरकर म्हणाले. हा सगळा रडीचा डाव आहे. एकनाथ शिंदे यांचं नेतेपद उजळून निघालं आहे. बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं शिवसैनिक मुख्यमंत्री पदी बसलाय याचा आनंद आहे, असं केसरकर म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी काहीही म्हटलं तरी आम्ही काहीही बोलणार नाही. आम्ही शिवसैनिक आहोत, आम्ही जी मुदत दिलेली होती ती संपून गेली. आमच्या मोहिमेचे सेनापती शिंदे साहेब आहेत. आम्ही सर्व पाश तोडून टाकले आहेत. उद्धव ठाकरेंना आम्ही काही उत्तर देणार नाही, असं दीपक केसरकर म्हणाले. एकनाथ शिंदे हे शाखाप्रमुख होते. शिवसेना केडरबेस पक्ष आहे, बाळासाहेबांनी शाखाप्रमुखांना सन्मान दिला. शाखाप्रमुख महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाल्यावर बाळासाहेब ठाकरेंनी त्यांचं कौतुक केलं असतं असं दीपक केसरकर म्हणाले. एक शिवसैनिक महाराष्ट्राच्या गादीवर बसवायचा होता, बसवून दाखवला आहे. आम्हाला एकही मंत्रिपद नको, असं दीपक केसरकर म्हणाले. शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्र्याच्या गादीवर बसला आहे. एकनाथ शिंदे यांनी शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र बनवण्याचा संकल्प केल्याचं दीपक केसरकर म्हणाले आहेत.