शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना मातृशोक; मुख्यमंत्र्यांकडून सांत्वन - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, July 13, 2022

शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना मातृशोक; मुख्यमंत्र्यांकडून सांत्वन

https://ift.tt/dNX0uCU
मुंबई : यांच्या मातोश्री यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. आज (१३ जुलै) दुपारी ३ ते संध्याकाळी ६ या कालावधीत पाली हिल येथील त्यांच्या निवासस्थानी पार्थिवाचे दर्शन घेता येणार आहे. त्यांच्यावर आज संध्याकाळी सांताक्रुझ पश्चिम येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्यसंस्काराला शिवसेनेचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे इतर नेते उपस्थित राहणार आहेत. (shiv sena secretary milind narvekars mother passed away due to old age) मिलिंद नार्वेकर यांच्या मातोश्रींच्या निधनाचे वृत्त समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर नेत्यांनी नार्वेकर यांचे सांत्वन केले. दरम्यान, शिंदेगटात गेलेले माजी मंत्री उदय सामंत यांनीही मिलिंद नार्वेकर यांचे सांत्वन केले आहे. दरम्यान, शिंदेगटात गेलेले माजी मंत्री उदय सामंत यांनीही मिलिंद नार्वेकर यांचे सांत्वन केले आहे. सामंत आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, 'शिवसेनेचे सचिव मा. मिलिंदजी नार्वेकर यांच्या मातोश्रींचे निधन झाल्याची बातमी कळली.. मिलिंदजींचे त्यांच्या आईवर अतोनात प्रेम होते, त्यांच्या जीवनात मातृप्रेमाची पोकळी निर्माण झाली आहे ती कधीही भरून न येणारी आहे .. त्यांना हे दुःख सहन करणयाची ताकद ईश्वराने द्यावी.'