मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे () यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेचे युवासेना प्रमुख, नेते, आमदार () आक्रमक झाले आहेत. राज्यात नाट्यमय पद्धतीने सत्तांतर झाल्यानंतर निष्ठा यात्रा काढत त्यांनी शिवसैनिकांशी संपर्क सुरू केला आहे. या निष्ठा यात्रेदरम्यान ते बंडखोरांवर हल्ला चढवत आहेत. आदित्य ठाकरे यांनी आज चेंबूर येथील शिवसेना शाखेला भेट देत शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांवर बरसले. आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे हे दुःख आहे. महाराष्ट्राचे नाव मोठे होत आहे, या पोटदुखीने ही गद्दारी केली, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवर हल्लाबोल केला. yuva sena chief aditya thackeray has criticized the rebels आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, हा उत्साह बघितल्यानंतर भाषण करायची गरजच नाही. वातावरण सगळं भगवं झालं आहे. ही निष्ठा यात्रेसाठी काही प्लॅनिंग केलं नव्हतं. मला तुम्हाला भेटायचं होतं. हे जे बंडखोर आहेत ते उद्धव ठाकरे, शिवसेना आणि शिवसैनिकांमुळे मोठे झाले. सामान्य लोकांना असामान्य ताकद देणं ही शिवसेनेची ओळख आहे. क्लिक करा आणि वाचा- राजकारण एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असं मला कधीही वाटलं नव्हतं. सगळं देऊन पक्षप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसून जातात हे राजकारण तुम्हाला मान्य आहे का? मुळात देशात लोकशाही शिल्लक राहिली आहे का? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. स्वतःच्या भल्यासाठी, तिथे तुमचं चांगलं होत असेल ना जा तुम्ही, सुखी रहा तिथे, लख लाभ तुम्हाला. जो तुमच्या मनात आमच्याबद्दल राग आहे ना, तो आमच्या मनात तुमच्याबद्दल नाही. काही लोक ७-७ वर्ष सत्तेत राहिले त्यांचं आता अपचन होत आहे, अशी टीका देखील आदित्य ठाकरे यांनी केली. क्लिक करा आणि वाचा- तुम्हाला वाटत असेल की लोकांना फसवत नाही ना तर निवडणुकीला सामोरे जा, लोकं तुम्हाला जागा दाखवतील. तुमच्यावर काही दडपण असेल, तुमच्या स्वतःच्या काही गोष्टी लपवायच्या असतील, तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्ही जायचं होतं. पण तुम्ही पक्ष फोडायला निघाला आहात, ज्या पक्षाने तुम्हाला सर्व काही दिलं तो पक्ष फोडायला निघालेत, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला. क्लिक करा आणि वाचा-