'रामदास कदम नावाची मुलुखमैदानी तोफ मैदानात यावी'; मुख्यमंत्री शिंदे थेट पोहोचले 'पालखी'वर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, July 28, 2022

'रामदास कदम नावाची मुलुखमैदानी तोफ मैदानात यावी'; मुख्यमंत्री शिंदे थेट पोहोचले 'पालखी'वर

https://ift.tt/YPFcO18
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख () यांनी माजी मंत्री (Ramdas Kadam) यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर कदम यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या समर्थक नेत्यांवर टीकास्त्र सोडायला सुरू केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ते उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत वेगवेगळे आरोपही करत आहेत. त्यानंतर रामदास कदम सतत चर्चेत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना कदम यांनी तर ठाकरेंवर घणाघाती टीका करत लक्ष वेधून घेतले. त्यानंतर रामदास कदम यांच्या वाढदिवसानिमित्त यांनी त्यांना त्यांच्या मुंबईतील कांदिवली येथील पालखी या निवासस्थानी भेटून शुभेच्छा दिल्या आणि रामदास कदम सारखा आक्रमक नेता पक्षासाठी आवश्यक असल्याचे सूचित केले. ( met at his residence palkhi) राज्यात युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ट्रायडन्ट हॉटेलमध्ये पार पडलेल्या बैठकीत त्यांनी रामदास कदम यांची शिवसेना पक्षाच्या नेतेपदी निवड केल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर रामदास कदम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. त्यानंतर आज झालेल्या या सदिच्छा भेटीला एक विशेष महत्व झाले आहे. शिवसेनेचा भगवा मंत्रालयावर डौलाने फडकत असतानाच रामदास कदम नावाची मुलुखमैदान तोफ पुन्हा एकदा पक्षबांधणीसाठी मैदानात यावी अशी अपेक्षा यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली. आपल्या राजकीय आयुष्याची ही इनिंग रामदास कदम यांनी पुन्हा त्याच जोशात सुरू करावी याच शुभेच्छा त्यांनी यावेळी कदम यांना दिल्या. यावेळी रामदास कदम यांचे दोन्ही सुपुत्र आमदार योगेश कदम आणि सिद्धेश कदम, आमदार बालाजी कल्याणकर आणि कदम कुटुंबीय उपस्थित होते.