सत्तासंघर्षाचे पडसाद विधानसभेत, तालिका अध्यक्षांमध्ये एकही सेना आमदार नाही - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, July 5, 2022

सत्तासंघर्षाचे पडसाद विधानसभेत, तालिका अध्यक्षांमध्ये एकही सेना आमदार नाही

https://ift.tt/VZFxzuH
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई ः राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षाचे पडसाद विधानसभेच्या कामकाजातही उमटल्याचे चित्र सोमवारी दिसून आले. विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनासाठी विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केलेल्या तालिका अध्यक्षांमध्ये शिवसेनेच्या एकाही आमदाराला स्थान देण्यात आले नव्हते. त्यामुळे शिंदे गटाने शिवसेनेला पुन्हा एकदा धक्का दिल्याची चर्चा सोमवारी विधान भवनात रंगली होती. विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभा अध्यक्षांनी तालिका अध्यक्षांची नावे जाहीर केली. यात भाजपचे आशीष शेलार, योगेश सागर, चेतन तुपे, संग्राम थोपटे आणि शिंदे गटातील संजय शिरसाट यांची नावे जाहीर करण्यात आली. मात्र यामध्ये शिवसेनेतील एकाही आमदाराला संधी न देण्यात आल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. विधिमंडळाच्या या विशेष अधिवेशनात याआधी शिवसेनेचे विधिमंडळ कार्यालय सील करण्यात आले. त्यानंतर शिवसेनेच्या मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले यांची निवड वैध ठरविली. त्यानंतर आता तालिका अध्यक्षांच्या यादीत स्थान न दिल्याने शिंदे गटाने शिवसेनेवर कुरघोडी केल्याची चर्चा विधान भवनात रंगली होती.