मोठी बातमी : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील दोन वाहनांचा अपघात, एकनाथ शिंदे सुखरूप - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, July 6, 2022

मोठी बातमी : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील दोन वाहनांचा अपघात, एकनाथ शिंदे सुखरूप

https://ift.tt/bPaJ95Y
मुंबई : मुख्यमंत्री यांच्या ताफ्यातील दोन वाहनांना अपघात झाल्याचं बातमी समोर आली आहे. मुंबई महापालिकेजवळ हा किरकोळ अपघात झाला यामध्ये कोणीही जखमी झालेलं नाही. चालकाचे नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्रवीर सावरकर स्मारकाला भेट दिल्यानंतर ते पावसाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाला भेट देण्यासाठी रवाना झाले. यावेळी पालिकेच्या मुख्यालयाजवळ येताना त्यांच्या ताफ्यातील दोन गाड्यांचा अपघात झाला. ताफ्यातील एका कारने पुढच्या कारला मागून जोरदार धडक दिली. पुढच्या कार चालकाने आपत्कालीन ब्रेक दाबल्याने हा प्रकार घडला. पुढची कार अचानक थांबल्याने मागच्या कार चालकाचं नियंत्रण सुटल्याने ती पुढच्या कारवर आदळली. परंतू या अपघातात कोणीही जखमी झालेलं नाही, अशी माहिती देखील मिळाली आहे.