बोरिस जॉन्सन यांचा राजीनामा, नव्या पंतप्रधानांची निवड कशी होणार? जाणून घ्या प्रक्रिया - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, July 8, 2022

बोरिस जॉन्सन यांचा राजीनामा, नव्या पंतप्रधानांची निवड कशी होणार? जाणून घ्या प्रक्रिया

https://ift.tt/0JIs3yH
लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान पदावरुन पायऊतार होणार असल्याचं जाहीर केलं. पक्षातील ४० खासदारांनी राजीनामा दिल्यानं राजकीय दबाव वाढल्यानं जॉन्सन यांनी हा निर्ण घेतला. ब्रिटनमध्ये नवा पंतप्रधान निवडण्याची प्रक्रिया भारतापेक्षा वेगळी आहे. भारतात एखाद्या पंतप्रधानानं राजीनामा दिल्यास त्या पक्षाचे खासदार बहुमतानं पंतप्रधानपदी व्यक्तीची निवड करतात. मात्र, ब्रिटनमधील पद्धत वेगळी आहे. ब्रिटनमधील पंतप्रधान निवडीची प्रक्रिया कशी होते? बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्यानंतर कंझर्व्हेटिव्ह पक्षाकडून नेत्याची निवड केली जाईल. पंतप्रधानपदासाठी इच्छुक असणारे उमेदवार पुढे येतील. पंतप्रधानपदासाठी पक्षातील दोन खासदारांची शिफारस आवश्यक आहे. यामध्ये स्वत: उमेदवार आणि आणखी एका सदस्याची शिफारस आवश्यक आहे. पक्षाच्या खासदारांपैकी उमदेवारींनी अर्ज केल्यानंतर पक्षांतर्गत पातळीवर मतदान प्रक्रिया घेतली जाते. खासदार सर्व उमेदवारांच्या नावापुढं पसंतीक्रम लिहितात. हे मतदान गोपनीय पद्धतीनं केली जाते. ज्या उमेदवारांना कमी मत मिळतात त्यांना मतमोजणी प्रक्रियेतून बाहेर काढलं जातं. ही प्रक्रिया जो पर्यंत दोन उमेदवार शिल्लक राहत नाहीत तोपर्यंत राबवली जाते. ज्यावेळी दोन उमेदवार उरतील त्यावेळी पोस्टल बॅलेट पद्धतीनं कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे सदस्य मतदान करतात. यामध्ये सर्वाधिक मत मिळालेला उमदेवार नेता निवडला जातो. पंतप्रधान पदासाठीच्या निवडीसाठी ब्रिटनमध्ये पूर्वी मंगळवारी आणि गुरुवारी मतदान होत असे. यावर्षी २१ जुलैपासून संसदेच्या सुट्ट्या सुरु होत आहेत. त्यापूर्वीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाण्याची शक्यता आहे. हाऊस ऑफ कॉमन्सचा नेता पंतप्रधान बनू शकतो, असा नियम ब्रिटनच्या राज्यपद्धतीत होत आहे. नवीन पंतप्रधान मध्यावधी निवडणूक जाहीर करु शकतो. पंतप्रधानपद निवडीसाठी किती वेळ लागेल ? पंतप्रधानपदाच्या निवडणुकीत किती उमेदवार रिंगणात उतरतात त्यावर ही प्रक्रिया अवलंबून असेल. २०१६ मध्ये डेविड कॅमेरुन यांनी राजीनामा दिल्यानंतर तीन आठवड्यात प्रक्रिया पार पडली होती. तर, २०१९ मध्ये थेरेसा मे यांच्याकडून बोरिस जॉन्सन यांना पदभार स्वीकारायला २ महिन्यांचा कालावधी लागला होता.