म.टा प्रतिनिधी, ‘हॅलो गायीज् आज में आत्महत्या करणे वाला हु, प्लीज मुझे फॉलो करे, कमेंट करे, ओके बाय, जय बाबा टकाटक’ हा नऊ सेकंदाचा व्हिडीओ तयार करुन व्हायरल करीत एका २२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी दुपारी एक वाजता ही घटना उघडकीस आली. धीरज शिवाजी काळे (वय २२, रा. हरीविठ्ठलनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. आज गुरूवारी सकाळी नऊ वाजता धीरज वडीलांसोबत स्टेट बँक कॉलनी येथे एका बंगल्यात फर्निचर काम करण्यासाठी गेला. थोडावेळ काम केल्यानंतर १०.३० वाजेच्या सुमारास तो घरातून बाहेर पडला. वडील दुसऱ्या खोलीत काम करीत होते. दुपारी एक वाजता डबा खाण्यासाठी वडीलांनी त्याला आवाज दिला. प्रतिसाद न आल्यामुळे वडीलांसह इतर लोकांनी धिरजचा शोध घेतला. वरच्या मजल्यावरील खोलीत धिरजने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. क्लिक करा आणि वाचा- नागरीकांनी धिरजचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवला. दरम्यान, धिरजने आत्महत्येपूर्वी नऊ सेकंदांचा एक व्हिडीओ काही मित्र, समाजमाध्यमात व्हायरल केला होता. त्यात त्याने मी आत्महत्या करीत आहे. माझा व्हिडीओ लाईक करा, कमेंट करा अशी विनंती केली आहे. धिरज समाज माध्यमांवर अॅक्टीव होता. त्याने आत्महत्येचा निर्णय देखील समाजमाध्यमावर जाहीर केला. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-