सांगली : जिल्ह्यातील विटा - मायणी रस्त्यावरील नागेवाडी गावाजवळ कार आणि दुचाकीचा झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या भीषण अपघाताचा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. दुचाकीस्वार आणि समोरून ओव्हरटेक करून येणाऱ्या कारमध्ये हा अपघात झाला आहे. भरधाव दुचाकीने समोरून येणाऱ्या गाडीला जोरात धडक दिली. ज्यामध्ये दुचाकी आणि दुचाकीस्वार ५ फूट वर उडून गाडीच्या मागील बाजूला जाऊन पडले. या अपघातात दुचाकीवरील एक तरुण जागीच ठार झाला आहे. अमोल माने (वय ३५) राहणार माहुली. खानापूर असे मृत तरुणाचे नाव आहे. तर त्याचा मित्र संकेश्वर माने रा. माहुली, खानापूर हा जखमी झाला आहे. अमोल आणि संकेश्वर हे दोघेजण विट्याहून मायणीकडे निघाले होते त्यावेळी नागेवाडी येथे आले असता समोरून ओव्हरटेक करून येणाऱ्या गाडीला जाऊन जोरदार धडकल्याने हा अपघात घडला आहे. याप्रकरणी गाडी चालकाच्या विरोधात विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.