
: फरशी पुलावरून वाहणाऱ्या पुराच्या पाण्यात () मोटारसायकल घालणे दोन तरुणांच्या जीवावर बेतले. हे दोन तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची () दुर्दैवी घटना मालेगावच्या (Malegaon) द्याने येथे मोसम नदीवर घडली. अब्दुल रहीम पठाण आणि शहजाद जाकीर शेख अशी या दोघांचे नाव असून दोघे गाळणे येथील असून मालेगावला कामा निमित्त आले होते. घरी परत जाताना ही घटना घडली. (Two youths were washed away in the flood waters in ) या घटनेची माहिती मिळताच तैराक ग्रुप मधील पोहणाऱ्या तरुणांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र या तरुणांना त्यांची मोटारसायकल मिळाली मात्र दोघांचा शोध लागला नाही. अंधार झाल्यामुळे शोध मोहीम थांबविण्यात आली आहे. फरशी पुलाची उंची कमी असल्याने थोडा जरी पाऊस झाल्या तरी हा पूल पाण्याखाली जातो असे नागरिकांनी सांगितले. पूल पाण्याखाली गेल्यावर तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला नव्हता. क्लिक करा आणि वाचा- नागरिकांनी केला 'हा' आरोप पुराच्या पाण्यात दोन तरुण वाहून गेल्यामुळे मालेगावात हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेला नागरिकांनी प्रशासनाला जबाबदार धरले आहे. मोसम नदीच्या परिसरात थोडा जरी पाऊस पडला तरी देखील हा पूल पाण्याखाली जातो. याचे कारण म्हणजे या पुलाची उंचीच खूप कमी आहे. ही स्थिती असल्यामुळे प्रशासनाने पाऊस पडल्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी बंद करायला हवा होता, असे नागरिकांचे म्हणणे आहे. प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळेच दोघे वाहून गेल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-