सलमान रश्दींवर अमेरिकेत जीवघेणा हल्ला, गळ्याजवळ चाकूनं सपासप वार - Times of Maharashtra

Saturday, August 13, 2022

demo-image

सलमान रश्दींवर अमेरिकेत जीवघेणा हल्ला, गळ्याजवळ चाकूनं सपासप वार

https://ift.tt/IvUD01a
photo-93528712
न्यूयॉर्क : भारतीय लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्कमधील बफेलोमध्ये चौटाउक्वामध्ये एका व्याख्यानावेळी चाकूनं जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. सलमान रश्दी यांची ओळख करुन दिल्यानंतर लगचेचच चाकूनं त्यांच्यावर वार करण्यात आले. सलमान रश्दी यांना 'द सैटेनिक वर्सेस' या पुस्तकाच्या लेखनावरुन जिवे मारण्याच्या धमक्या देखील देण्यात आल्या होत्या. धमक्या मिळाल्यानंतर त्यांच्यावर तब्बल ३३ वर्षांनी हल्ला करण्यात आला. शुक्रवारी सकाळी सलमान रश्दी सीएचक्यू २०२२ च्या कार्यक्रमातील व्याख्यानासाठी मंचावर पोहोचले होते. यावेळी त्यांच्यावर चाकूनं जीवघेणा हल्ला करण्यात आला. न्यूयॉर्क पोलिसांनी याबाबत एका आरोपीनं हल्ला केल्याचं म्हटलं. सलमान रश्दी मंचावर व्याख्यान देण्यासाठी जात असताना हा हल्ला करण्यात आला. सलमान रश्दी यांच्या गळ्यावर चाकूनं वार करण्यात आले. पोलिसांनी तात्काळ हेलिकॉप्टरनं सलमान रश्दी यांना रुग्णालयात दाखल केलं आहे. सलमान रश्दी यांच्या द सैटेनिक वर्सेस या पुस्तकावर इराणमध्ये १९८८ पासून बंदी घालण्यात आली आहे. काही मुस्लीम लोक त्याचा विरोध करतात. इराणमधील दिवंगत नेता अयातुल्ला रुहोल्लाह खुमैनी यानं सलमान रश्दींविरोधात फतवा काढला होता. रश्दी यांना मारणाऱ्याला ३ दशलक्ष अमेरिकन डॉलरचं बक्षीस देण्याची घोषणा त्यानं केली होती. मात्र, अयातुल्लाह रुहोल्लाह याचं निधन जालं आहे. इराण सरकारनं खुमैनीच्या फतव्यापासून दूर राहणं पसंत केलं. रश्दी यांच्या विरोधातील भावना कयम होती. सलमान रश्दी यांच्यावर त्यांनी त्यांच्या लेखनातून मोहम्मद पैगंबर यांचा अपमान केल्याचा आरोप कट्टरतावाद्यांनी केला होता. मात्र, त्याबाबत सलमान रश्दी यांनी खुलासा केला होता. सलमान रश्दी यांच्या विरोधात संपूर्ण जगात निदर्शनं करण्यात आली होती. मुस्लीम धर्मगुरुंनी सैटेनिक वर्स पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली होती. न्यूयॉर्कच्या गवर्नर काथेय होछूल यांनी सलमान रश्दी जिवंत असून त्यांना एअरलिफ्ट करण्यात आल्याची माहिती दिली. सलमान रश्दी सुरक्षित असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आल्याची माहिती देखील न्यूयॉर्कच्या गवर्नर दिली.

Pages