माठातलं पाणी प्यायल्याने मारहाण,दलित विद्यार्थ्याचा मृत्यू, जालोरमध्ये तणाव, इंटरनेट बंद - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, August 15, 2022

माठातलं पाणी प्यायल्याने मारहाण,दलित विद्यार्थ्याचा मृत्यू, जालोरमध्ये तणाव, इंटरनेट बंद

https://ift.tt/uXnm9l2
जयपूर : राजस्थानातील जालोर मधील एका दलित मुलाचा शिक्षकाने मारहाण केल्याने मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला. जालोर मधील सुराणा गावातील परिस्थिती बिघडल्याने प्रशासनाने इंटरनेट बंद केलं आहे. पोलिसांनी या भागातील बंदोबस्त देखील वाढवला आहे, ही घटना सरस्वती विद्यामंदिर स्कूल मध्ये 20 जुलै रोजी घडली होती. तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या नववर्षाच्या मुलांना माठातून पाणी घेण्याचा प्रयत्न केल्याने शाळेचे संचालक छैलसिंह यांनी त्याला मारहाण केली होती. त्या मुलाला जातीवाचक शब्द वापरून अपमानित केलं होतं. त्या मुलानं ज्या माठातून पाणी घेतलं होतं तो छैल सिंह याच्यासाठी वेगळा ठेवला गेला होता. या सगळ्या प्रकारामुळे संतापलेल्या शिक्षकानं त्या लहान मुलाला मारहाण केली. त्यामुळे त्या मुलाच्या उजव्या कानामध्ये आणि डोळ्यांमध्ये इजा झाली होती. पोलिसांनी याप्रकरणी शिक्षकाला अटक केली आहे तर आरोपी विरोधात जातीवाचक शब्दांचा वापर करून अपमानित करणे आणि मारहाणी नंतर हत्या करण्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संबंधित मुलाचा १३ ऑगस्टला मृत्यू झाला. जालोरमधील इंटरनेट पोलिसांनी बंद केलं आहे. इंद्रकुमार मेघवाल या ९ वर्षाच्या मुलाच्या मृत्यूनंतर गावामध्ये तणाव निर्माण झाला. सायंकाळी चार वाजता संबंधित मुलाचे कुटुंबीय आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. पुढे .याच रुपांतर दगडफेकीत झालं पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लाठीमार केला. या सगळ्या घटनेत मृत मुलाचे वडील देवाराम मेघवाल हे देखील जखमी झाले आहेत. याशिवाय आणखी 10 ते 12 जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी भीम आर्मीच्या काही सदस्यांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, पोलीस मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना एक नोटीस देण्यासाठी गावात पोहोचले होते. संबंधित मुलाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी दबाव टाकण्यात आल्यानं ग्रामस्थ आक्रमक झाले होते. तर, ग्रामस्थांनी आक्रमक होऊ नये म्हणून पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर दोन्ही गटांमध्ये झटापट झाली. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आरोपीच्या विरोधात ॲट्रॉसिटी ॲक्ट च्या अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती यापूर्वीच दिली होती. मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपये देण्याचा निर्णय अशोक गेहलोत यांनी जाहीर केला आहे.