
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार बहूप्रतिक्षित महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, केंद्र सरकारकडून या निर्णयाची अद्यापही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. विविध महिन्यांपासून सुरु असलेल्या अंदाजांना बाजूला सारत ४ टक्के महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला असल्याचं कळतंय. महागाई भत्ता वाढवल्याबद्दल आगामी काळात केंद्राकडून अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. आता महागाई भत्ता ४ टक्केंनी वाढवण्याचा निर्णय झाल्यास केंद्र सरकारच्या सेवेतील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३८ टक्के पर्यंत पोहोचला जाणार आहे. केंद्र सरकारनं महागाई भत्ता ४ टक्केंनी वाढवण्यात आल्याची माहहिती सूत्रांनी दिली आहे. यासंदर्भातील अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सुधारित महागाई भत्ता सप्टेंबर २०२२ पासून मिळळळणार असल्याची माहिती मिळाली आहे. नव्या निर्णयामुळं केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारक अशा १ कोटी जणांना नव्या महागाई भत्त्याचा लाभ होणार आहे. नवा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात सप्टेंबर २०२२ पासून जमा केला जाईल असं कळतंय. मात्र, हा भत्ता देताना जुलै २०२२ पासून दिला जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारनं रक्षा बंधनाची भेट दिली असल्याचं बोललं जात आहे. संसदेत विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला महागाईच्या मुद्यावरुन घेरण्याचा प्रयत्न केला होता. महागाईच्या प्रश्नाला निर्मला सितारम्ण यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. केंद्र सरकार विरोधकांचा हल्ला परतवून लाववण्यासाठी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना ४ ते ५ टक्के महागाई भत्ता वाढ देईल अशा चर्चा सुरु होती. केंद्र सरकार जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाईच्या आकडेवारीच्या आधारे डीए आणि डीआरमध्ये बदल करते. देशातील महागाई रिझर्व्ह बँकेच्या अंदाजाच्या वर गेली आहे. केंद्र सरकारनं जानेवारी ते जून महिन्यासाठी महागाई भत्ता वाढवलेला आहे. आता जुलै ते डिसेंबर महिन्यासाठी महागाई भत्ता किती प्रमाणात वाढवला जाणार हे पाहावं लागणार आहे.