गोल्ड मेडल... भारताच्या सुधीरने रचला इतिहास, सुवर्णपदकासह केला मोठा विक्रम - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, August 5, 2022

गोल्ड मेडल... भारताच्या सुधीरने रचला इतिहास, सुवर्णपदकासह केला मोठा विक्रम

https://ift.tt/EoLi913
नवी दिल्ली : भारताच्या सुधीरने गुरुवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या हेवीवेट पॅरा पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. आशियाई पॅरा गेम्सच्या कांस्यपदक विजेत्या सुधीरने यावेळी पहिल्या प्रयत्नात २०८ किलो वजन उचलले आणि १३४.५ गुण मिळवत विक्रम रचला. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात २१२ किलो वजन उचलले आणि सुवर्णपदक आपल्या नावावर केले. पॅरा पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्यानंतर सुधीरने भारतासाठी पॅरा स्पोर्ट्समध्ये पदकाचे खाते उघडले. पुरुषांच्या हेवीवेट प्रकारात प्रथम आल्यावर त्याने राष्ट्रकुल स्पर्धेमधील भारताचे सहावे सुवर्ण जिंकले. त्याने १३४.५ गुण मिळवले आणि त्याने संपूर्ण स्पर्धेत अव्वल क्रमांक आपल्याकडेच ठेवला. त्याचबरोबर सुधीरने नवीन खेळ विक्रम प्रस्थापित केला. या विजयासह भारताची सहा सुवर्णपदके झाली असून ते पदकतालिकेत सातव्या स्थानावर पोहोचले आहेत. सुधीरने दुसऱ्या प्रयत्नात २१२ किलो वजन उचलले जे त्याला सुवर्णपदक मिळवून देण्यासाठी पुरेसे होते. नायजेरियाच्या ख्रिश्चन ओबिचुकवू आणि स्कॉटलंडच्या मिकी युलने अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक जिंकले. श्रीशंकरने पटकावले रौप्यपदकभारताच्या मुरली श्रीशंकरने पुरुषांच्या लांब उडीत ८.०८ मीटर अंतरासह ऐतिहासिक रौप्यपदक जिंकले. केरळमधील पलक्कड येथील २३ वर्षीय हा लांब उडीत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला पुरुष भारतीय खेळाडू ठरला आहे. या स्पर्धेत श्रीशंकर हा सहावा होता. पण फक्त एकाच दमदार उडीच्या जोरावर त्याने दुसरा क्रमांक गाठला आणि रौप्यपदकाला गवसणी घातली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत लांब उडीत भारताच्या दोन महिलांनी पदक जिंकले होते, पण पुरुषांमध्ये पदक जिंकणारा श्रीशंकर हा पहिलाच भारतीय ठरला. श्रीशंकरला पदक मिळवण्यात यश आले. पण हे यश श्रीशंकरला खडतर संघर्षानंतर मिळाले आहे. कारण श्रीशंकरची चौथ्या प्रयत्नात ८ मीटरची लांब उडी अवैध ठरवण्यात आली. पण त्याने हार मानली नाही आणि पुढच्या प्रयत्नामध्ये त्याने नेत्रदीपक कामगिरी करून दाखवली. पाचव्या प्रयत्नात ८.०८ मीटर लांब उडी मारून सहाव्या क्रमांकावरून थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली.