वर्षा राऊत यांची आज 'ईडी' चौकशी; १. ०८ कोटी बेहिशेबी रकमेबद्दल होणार विचारणा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, August 5, 2022

वर्षा राऊत यांची आज 'ईडी' चौकशी; १. ०८ कोटी बेहिशेबी रकमेबद्दल होणार विचारणा

https://ift.tt/Ealkju4
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना चौकशीचे समन्स बजावले आहे. त्यांना आज, शुक्रवारी 'ईडी'च्या बॅलार्ड पिअर येथील क्षेत्रीय संचालनालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. गोरेगावच्या पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात जवळपास १०३४ कोटी रुपयांचा घोटाळा झाला. घोटाळे करणाऱ्यांनी या १०३४ कोटी रुपयांपैकी काही रक्कम शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि अन्य काही आरोपींकडे वळती केली व त्यातूनच राऊत यांनी पत्नीच्या नावे काही मालमत्ता खरेदी केल्या, असे 'ईडी'च्या तपासात समोर आले आहे. त्या मालमत्तांवर 'ईडी'ने टाच आणली असली तरी आता १.०८ कोटी रुपयांचा एक मुद्दा समोर आला आहे. त्याच प्रकरणी 'ईडी'ला वर्षा राऊत यांची चौकशी करायची असल्याचे सूत्रांनी सांगितले. 'पत्राचाळ पुनर्विकास घोटाळा करणाऱ्या प्रवीण राऊत यांच्याकडून १.०८ कोटी रुपये वर्षा राऊत यांच्या खात्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. ही १.०८ कोटी रुपये रक्कम नेमकी कुठली आहे, याची नेमकी माहिती संजय राऊत यांनी चौकशीच्या वेळी दिली नाही. त्यामुळेच वर्षा राऊत यांची चौकशी करणे अत्यावश्यक आहे. त्यातूनच त्यांना समन्स बजाविण्यात आले आहे', असे सूत्रांनी सांगितले. खंडेलवाल यांनाही अटक या प्रकरणाशी निगडित स्टॉक ब्रोकर चंद्रप्रकाश खंडेलवाल यांनादेखील 'ईडी'ने गुरुवारी अटक केली. खंडेलवाल हे पीएसीएल (पर्ल समूह) चीटफंड घोटाळ्यातील आरोपी आहेत. पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्यातीलच काही रक्कम पीएसीएल समूहाकडेही गेल्याचा 'ईडी'ला संशय आहे. त्यामुळे खंडेलवाल व संजय राऊत यांच्यात काही संबंध आहेत का, हे शोधण्यासाठी 'ईडी'ने त्यांना अटक केली आहे. पीएसीएलच्या संचालकांनी विविध प्रलोभने दाखवत सर्वसामान्यांकडून ६० हजार कोटी रुपये जमा केले. खंडेलवाल हे त्यामधील प्रमुख ब्रोकर होते. त्यामुळेच त्यांना अटक करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.