
जळगाव : मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आज पहिल्यांदाच जळगावमध्ये दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांचा प्रचंड उत्साह यावेळी पाहायला मिळाला. यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. या दरम्यान यांच्या वाहनाच्या ताफ्यामागे शेकडो कार्यकर्त्यांची वाहने चालत असल्याने अंमळनेर ते जळगाव पर्यंत महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. (while welcoming in jalgaon ) तर, दुसरीकडे बेफान झालेल्या मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी धावत्या वाहनात खिडकीवर बसून तसेच वाहनाच्या टपावर बसून केल्याचेही यावेळी पाहायला मिळाले. चक्क वाहनाच्या टपावर बसून तरुण ढोल आणि ताशे वाजवत असल्याचंही चित्र यावेळी पाहायला मिळाले. प्रचंड वाहतूक कोंडीमुळे नागरिक आणि शाळकरी मुलांसह महिला तसेच वाहनधारकांची यावेळी प्रचंड गैरसोय झाल्याचे पाहायला मिळाले. क्लिक करा आणि वाचा- वाहतुकीची कोंडी सोडत सोडवत तसेच स्टंटबाजी करणाऱ्या या कार्यकर्त्यांमुळे हैराण झाल्याचे तसेच पोलीस कर्मचाऱ्यांच्या नाकी नऊ आल्याचे चित्र होते. दरम्यान, बंडखोरीनंतर गुलाबराव पाटील यांचे काही खरे नाही असे म्हटले जात होते. आज मात्र जळगावात त्यांचे उत्स्फुर्त स्वागत झाले. मात्र जे म्हणत होते त्यांना आजची गर्दी पाहून उत्तर मिळालं असेल, अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे. माझ्या स्वागतासाठी एक असे गाव नाही की ज्या गावातून लोक आले नाही. ही गर्दी पाहून लक्षात आलं असेल की गुलाबराव पाटलांचे कुणी काही वाकडे करू शकत नाही, असेही गुलाबराव पाटील यांनी पुढे म्हटले आहे. क्लिक करा आणि वाचा- मी माझा तिसरा डोळा उघडला, तर मी काही करू शकतो हे कुणाला माहीत नाही, असे आव्हानही मंत् गुलाबराव पाटी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटले. मंत्र्यांचे खातेवाटपही लवकरच होईल, असेही त्यांनी सांगितले. क्लिक करा आणि वाचा-