महाविकास आघाडीत होणार या मुद्द्यावर मोठा वाद?; उद्या आघाडीची महत्वाची बैठक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, August 11, 2022

महाविकास आघाडीत होणार या मुद्द्यावर मोठा वाद?; उद्या आघाडीची महत्वाची बैठक

https://ift.tt/yG15YcR
जळगाव : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेने (Shiv Sena) विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी आपल्या पक्षातील नेत्याची नियुक्ती केली असली, तरी काँग्रेस पक्ष मात्र हे मानायला तयार नाही. या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत मदभेद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. याचे कारण म्हणजे काँग्रेसने अजूनही विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावरचा आपला दावा सोडलेला नाही. काँग्रेसचे नेते आणि माजी महसूल मंत्री यांनी तसे स्पष्टपणे सांगितले आहे. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राष्ट्रवादीकडे आहे, तर विधानसभेमध्ये उपसभापतीपद शिवसेनेकडे आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते पद हे आम्हाला मिळाला पाहिजे अशी, आमची आग्रही भूमिका असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जळगावात दिली आहे. (There is a possibility of disagreement in Mahavikas Aghadi over the post of Leader of the Opposition in the Legislative Council) महाविकासा आघाडीतील पक्षांच्या आमदारांचे संख्याबळ पाहता जवळपास सर्व सामान आहेत, असे दिसते. त्यामुळे काँग्रेसलाच विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेतेपद देणे आवश्यक आहे. या बाबत उद्या तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या याबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. दुर्दैवाने शिवसेनेकडून विचारणा झाली नाही आणि हा आमचा आक्षेप असल्याचेही बाळासाहेब थोरात म्हणाले. आम्ही जर मित्र आहोत, आमची जर आघाडी आहे तर एकामेकांशी बोलले पाहिजे, अशा शब्दात बाळासाहेब थोरात यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेतर्फे शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांची विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दानवे यांच्या नावाची शिफारस करणारे पत्रत विधान परिषदेच्या सभापतींना लिहिले आहे. सध्या विधान परिषदेचे सभापतीपद रिक्त असल्याने त्याचे सर्व अधिकार उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे आहेत. शिवसेनेचे उपनेत आणि खासदार अरविंद सावंत यांनी हे पत्र काल सुपूर्द केले.