तेरी अखियों का ये काजल; सपना चौधरीच्या ठुमक्यावर थिरकले बीडकर; छतावर, क्रेनवर पटकावली जागा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, August 19, 2022

तेरी अखियों का ये काजल; सपना चौधरीच्या ठुमक्यावर थिरकले बीडकर; छतावर, क्रेनवर पटकावली जागा

https://ift.tt/SR65wBa
: करोनाच्या सावटानंतर बीड जिल्ह्यात यंदा दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत आहे. प्रसिद्ध हरियाणाची नर्तकी सपना चौधरीसाठी (Sapna Chaudhary) बीडमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. आपल्या जीवाची पर्वा न करता तरुणाईने दुकानाच्या छतावर क्रेन मिळेल त्या ठिकाणी बसून सपनाची एक झलक पाहण्यासाठी गर्दी केली. (Bidkars made a huge crowd to watch ) दीप ज्योत ग्रुपच्या वतीने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे दोन दिवसापूर्वी अपघाती निधन झालं. या कार्यक्रमात सुरुवातीला दोन मिनिटं स्तब्ध राहून मेटे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दोन वर्षानंतर बीडकरांनी दहीहंडीचा अनुभव घेतला आहे. तेरी अखियों का ये काजल.... या प्रसिद्ध गाण्यावर सपनाने ठुमके लगावले, बीडकरांनी देखील याला दाद दिली. क्लिक करा आणि वाचा- दरम्यान, या आधी देखील परळीमध्ये सपना चौधरीचे ठुमके जिल्हावासीयांनी अनुभवले होते. आज मात्र दहीहंडी निमित्त सपना आली असता तिने महाराष्ट्रातील दहीहंडी उत्सव पाहण्याची इच्छा व्यक्त केली. आणि बीडकरांनी तिची ही इच्छा पूर्ण केली. क्लिक करा आणि वाचा- दुसरीकडे मात्र अतिवृष्टीने शेतकरी संकटात असताना हा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात घेतल्याने, पुढाऱ्यांना शेतकऱ्यांचे दुःख आहे की नाही? , असे सवाल उपस्थित केले जात आहेत. या कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांच्या दु:खाचा नेत्यांना विसर पडल्याचं पाहायला मिळालं, अशाही प्रतिक्रिया ऐकू येऊ लागल्या आहेत. शिवसेना नेते योगेश क्षीरसागर, भाजप नेते भगीरथ बियाणी यासह विविध पक्षातील मंडळी सपनाचा पाहण्यासाठी आले होते. क्लिक करा आणि वाचा-